सोलापूर ग्रामीणमध्ये 134 नवे कोरोना बाधित, 167 जण कोरोना मुक्त 

प्रमोद बोडके
Saturday, 28 November 2020

तालुकानिहाय बाधित. कंसात मृत्यू संख्या 
अक्कलकोट : 1154 (69), बार्शी : 6257 (185), करमाळा : 2140 (51), माढा : 3710 (115), माळशिरस : 6404 (133), मंगळवेढा : 1596 (46), मोहोळ : 1731 (85), उत्तर सोलापूर : 781 (38), पंढरपूर : 7221 (213), सांगोला : 2728 (47), दक्षिण सोलापूर : 1515 (51), एकूण : 35237 (1033) 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीची 2 हजार 287 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2 हजार 153 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 134 अहवाल पॉझिटिव्ह आले असून कोरोना चाचणीचे 48 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. आज एकाच दिवशी 167 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाल्याचेही आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागातील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या आता 35 हजार 237 झाली आहे. ग्रामीण भागातील 1 हजार 33 जणांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या 1 हजार 774 ऍक्‍टिव्ह कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागातील 32 हजार 430 जण आत्तापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत.

ग्रामीण भागातील 11 हजार 990 जणांना सध्या होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. 3 हजार 128 जण सध्या इन्स्टिट्युन्शल क्वारंटाईनमध्ये आहेत. आजच्या अहवालामध्ये मृत दाखवण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये सांगोल्यातील देशमुख वस्ती येथील 76 वर्षिय पुरुष, पंढरपूर तालुक्‍यातील अव्हे येथील चाळीस वर्षिय पुरुष आणि उत्तर सोलापूर तालुक्‍यातील नान्नज येथील 81 वर्षिय पुरुषाचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Solapur rural 134 new corona infected, 167 corona free