सोलापूर ग्रामीणमध्ये 411 कोरोनाबाधितांची भर, सात जणांचा मृत्यू : 133 अहवाल प्रलंबित 

corona
corona

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये मंगळवारी रात्री बारापर्यंत 411 नवीन कोरोना बाधितांची भर पडली आहे. सात जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून कोरोना मुक्त झालेल्या 166 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. कोरोना चाचणीचे 133 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. 

नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये अक्कलकोटमधील भारत गल्ली, समर्थ नगर, शिवाजी नगर, शिवपार्वती नगर, बार्शीतील ऐनापुरे रोड, अलीपूर रोड, बालाजी कॉलनी, बारंगुळे प्लॉट, उत्तरेश्वर मंदिराजवळ, भागवत ब्लड बॅंक, भांडे गल्ली, भवानी पेठ, भोगेश्वरी चाळ, बायपास रोड, कॅन्सर हॉस्पिटल, दाणे गल्ली, देवाने गल्ली, ढगे मळा, धस पिंपळगाव, ढेंबरेवाडी, एकविरा आई चौक. फाफळवाडी, घोडके प्लॉट, गोंडिल प्लॉट, हांडे गल्ली, कासारवाडी, कसबा पेठ, कतले प्लॉट, कुर्डूवाडी रोड, महावीर रोड, मंगाडे चाळ, मनगिरे मळा, मिरगणे कॉम्प्लेक्‍स, नागणे प्लॉट, पाटील प्लॉट, रेल्वे क्वार्टर, राऊत चाळ, सौंदरे, सिद्धेश्वर नगर, सिरसगाव, सोलापूर रोड, सोमवार पेठ, स्टेशन रोड, सुभाष नगर, सुतार नेट, तेलगिरणी चौक, उपळाई रोड, उपळाई ठोंगे, विठ्ठल नगर, वायकुळे प्लॉट याठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

करमाळ्यातील आलेश्वर, बागवान नगर, चिकलठाण, दगडी रोड, हिरडे प्लॉट, खडकपुरा, खांबेवाडी, कॉटेज हॉस्पिटल, कुगाव, मांगी, मुठ्ठानगर, नागोबा मंदिर, राशीन पेठ, रावगाव, एसटी कॉलनी, साडे, सांगवी, शिवाजीनगर, सिद्धार्थनगर, उमरड. वांगी झरे या ठिकाणी नवे रुग्ण आढळले आहेत. माढा तालुक्‍यातील कुर्डू, कुर्डूवाडी, मालेगाव, मोडनिंब, संमतीनगर, शिवाजीनगर, टेंभुर्णी, तुळशी, वडाचीवाडी, वाकाव, माळशिरस तालुक्‍यातील अकलूज, बोंडले, फोंडशिरस, गारवाड, गोरडवाडी, जांबुड, माणकी, म्हसवड रोड माळशिरस, नातेपुते, संग्रामनगर, श्रीपुर, यशवंनगर, मंगळवेढा तालुक्‍यातील आंधळगाव, ब्रह्मपुरी, चोखामेळानगर, दुर्गामाता नगर, इंगळे गल्ली, काझी गल्ली, मल्लेवाडी, मानेवाडी, सराफ गल्ली, साठेनगर, मोहोळ तालुक्‍यातील अनगर, अण्णाभाऊ साठे नगर मोहोळ, वाफळे, नजीक पिंपरी, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील एकरुख, इंडियन ऑइल कंपनी पाकणी, कळमण, कोंडी, पंढरपूर तालुक्‍यातील आढीव, अकबर गल्ली, आंबेडकर नगर, आनंद नगर, भाळवणी, भंडीशेगाव, भोसले चौक, भोसे, बोहाळी, चळे, चिंचबन तालीम, डाळे गल्ली, देगाव, डोंबे गल्ली, गादेगाव, गजानननगर, गांधी रोड, गाताडे प्लॉट, गोपाळपूर, गुरसाळे, इंदिरा गांधी मार्केट, इसबावी, कडबे गल्ली, काळा मारुती मंदिर जवळ, करकंब, कासेगाव, कोर्टी, लक्ष्मी टाकळी, लिंक रोड, महावीरनगर, मुंढेवाडी, नवीन कराड नाका, ओमकारनगर, पळशी, रुक्‍मिणीनगर, संत पेठ, शेळवे, शेटफळ, सब जेल, तुंगत, उंबरगाव, वीरसागर नगर, वाखरी, झेंडे गल्ली या ठिकाणी बाधित आढळले आहेत. 

सांगोला तालुक्‍यातील अकोला, बनशंकरी अलंकार, भाग्यश्री ज्वेलर्स, भिमनगर, तांदुळवाडी, धायटी, हलदहिवडी, हिताश्री ज्वेलर्स, जवळा, जय भवानी चौक, कटफळ, महूद रोड सांगोला, माऊली गोल्ड फायनान्स, नगरपरिषद क्वॉर्टर, म्युन्सिपल क्वॉर्टर, नाझरे, नेहरू चौक, पूजा ज्वेलर्स, वाणीचिंचाळे, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील आयजीएम कंपनी, मंद्रूप, एनटीपीसी, विडी घरकुल या ठिकाणी नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची संख्या 12 हजार 125 झाली असून आजपर्यंत 349 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या 3 हजार 110 जणांवर उपचार सुरू असून 8 हजार 666 मुक्त झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com