विधानपरिषदेत नऊपैकी ‘या’ जिल्ह्याला मिळणार दोन जागा?

Solapur will get two seats out of nine in the Vidhanparishad
Solapur will get two seats out of nine in the Vidhanparishad

सोलापूर : राज्यात कोरोना व्हायरसने घातलेल्या धुमाकूळीमध्ये विधानपरिषदेच्या निवडणूकीने राजकीय वातावरण तापले आहे. ही निववडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरु असताना दिसत आहेत. ही निवडणूक लागली किंवा बिनविरोध झाली तरी सोलापूर जिल्ह्याला मात्र दोन जागा मिळण्याची शक्यता आहे.  या निवडणूकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भवितव्य ठरणार असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्यावर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक झाली. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीपासून विधानसभेपर्यंत भाजप व शिवसेनेकडे जाणाऱ्यांचा कल होता. अशा स्थितीत भाजप, शिवसेना व त्यांचे घटकपक्ष यांनी एकत्रित व काँग्रेस, राष्ट्रवादी व इतर पक्षांच्या मदतीने निवडणूक लढले. यामध्ये भाजप व शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र मुख्यमंत्रीपदावरु नत्यांची युती तुटली आणि काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेनी एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने कोरोनाच्या सावटात ते आमदार होणार की, नाही असा प्रश्‍न निर्माण झाला. दरमन्यानच्या घडामोडीत निवडणूक आंयोगाने सुरक्षेची काळजी घेऊन निवडणूकीला परवानगी दिली आणि कार्यक्रम जाहीर झाला. त्यासाठी २१ तारखेला मतदान होणार आहे. आणि त्याच दिवशी निकालही होणार आहे. नऊ जागांसाठी होणाऱ्या निवडणूकीत अनेक इच्छुकांची नावे पुढे येत आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यात इतर नावांपैकी माळशिरसचे मोहिते पाटील आणि मोहोळचे राजन पाटील यांचे नावे मोठ्याप्रमाणात चर्चेत आहे. त्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्यासाठी अग्रही आहेत.  

हेही वाचा : सोलापूर महापालिकेतील सर्व कार्यालये उद्यापासून सुरु
महाविकास आघाडीकडून राजन पाटील?

विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीवेळी राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून शिवसेना आणि भाजपमध्ये अनेकांनी प्रवेश केला. तेव्हा मोहोळचे राजन पाटील यांना सुद्धा ऑपर दिलेली असताना सुद्धा त्यांनी पक्ष सोडला नाही. पडत्या काळातही त्यांनी पक्षासाठी परिश्रम घेतले. विधानसभा निवडणूकीत प्रमाणिकपणे काम करुन त्यांनी मोहोळमध्ये यशवंत माने यांना विजयी करुन राष्ट्रवादीच्या जागेत वाढ केली. त्यामुळे त्यांना विधानपरिषदेची उमदवारी द्यावी, अशी मागणी केली जात आहे. समाधन मुळे म्हणाले,  राजन पाटील हे पडत्या काळात ते राष्ट्रवादीबरोबर होते. सर्वजण भाजपमध्ये जात असताना ते गेले नाहीत. भाजपमधून विकास होऊ शकत नाही. शरद पवार यांच्यावर त्यांची निष्ठा आहे. आता पवारसाहेबांनी त्याचा विचार करुन त्यांना संधी द्यावी. सध्या कोरोनाच्या सावाटात जनतेला आधार देण्यासाठी ते धीर देण्याचे काम करत आहेत. 

भाजपकडून मोहिते पाटील?
लोकसभा निवडणूकीवेळी विजयीसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजिव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम करुन भाजपमध्ये प्रवेश केला. विजयीसिंह मोहिते पाटील यांनी अद्याप भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केलेला नसला तरी ते भाजपमध्ये असल्याचे मानले जाते. विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांनी अद्याप राष्ट्रवादी सोडली नसल्याचे विधानही केले होते. असं असलं तरी मोहिते पाटील हे भाजपचेच असल्याचे मानले जात आहे. प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी त्यांनी हजेरी लावली होती. त्यांनी ताकदीने प्रचार केला. रणजितसिह नाईक निंबाळकर यांना विजयी करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. याशिवाय विधानसभा निवडणूकीवेळीही त्यांनी भाजपचा प्रचार केला. त्यात माळशीरसचीही जागा भाजपला जिंकता आली. आमदार राम सातपुते यांना विजयी करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

सोलापूरातील बातम्या वाचण्यासाठी येथे करा क्लिक
म्हणून सोलापूरला दोन जागा मिळू शकतात

विधानपरिषदेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातून इच्छुक नावांपैकी राजन पाटील आणि मोहिते पाटील यांची नावे आघाडीर आहेत. राजन पाटील यांची पक्ष निष्ठा पडत्या काळातही ते राष्ट्रवादीबरोबर राहिले म्हणून त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळू शकते. तर मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजिंतसिह मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणूकीवेळी भाजप प्रवेश केला असला तरी त्यांना अद्याप कोणतेही पद दिलेले नाही. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळू शकते. 

अशा मिळू शकतात जागा
महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहता त्यांना पाच जागा सहजपणे जिंकता येतील असे चित्र आहे. मात्र, काँग्रेस सहाव्या जागेसाठी आग्रही असल्याने आघाडीकडून जोर लावला जाण्याची शक्यता आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची आघाडी असलेल्याने त्यांना प्रत्येकी दोन जागांची वाटणी होऊ शकते. भाजपकडील संख्याबळ पाहता त्यांना तीन जागा सहज जिंकता येतील अशी शक्यता आहेत. मात्र, त्यांनी चौथ्या जागेसाठी प्रयत्न सुरु केले आहेत अशी चर्चा आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार की मतदान होणार हे येणाऱ्या काही दिवसांमध्येच स्पष्ट होणार आहे.
विधानपरिषदेच्या ज्या जागा रिक्त झाल्यात त्यात भाजपच्या तीन, राष्ट्रवादीच्या तीन, काँग्रेसच्या दोन आणि शिवसेनेची एक जागा आहे. संख्याबळाचा विचार केला तर महाविकासआघाडीच्या पाच आणि भाजपच्या तीन जागा सहज निवडून येतील.

असे आहेत आमदार
भाजपकडे 105, शिवसेनेकडे 56, राष्ट्रवादीकडे 54, काँग्रेसचे 44, बहुजन विकास आघाडीचे तीन, समाजवादी पार्टीचे दोन, एमआयएमचे दोन, प्रहार जनशक्तीचे दोन, मनसे एक, माकप एक, शेतकरी कामगार पक्ष एक, स्वाभिमानी पक्ष एक, राष्ट्रीय समाज पक्ष एक, जनसुराज्य पक्ष एक, क्रांतिकारी शेतकरी पक्ष एक, व अपक्ष 13 अशी आमदारांची संख्या आहे. त्यातून निवडून येण्यासाठी एका जागेसाठी 29 मतांची गरज आहे. त्यामुळे या निवडणुकीत एका जागेसाठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला पाच जागा सहज जिंकता येतील अशी चिन्हे आहेत. मात्र, अपक्षांना एकत्र करता आलं तर सहाव्या जागेवर  महाविकासआघाडी दावा करु शकेल. आघाडीचा हाच प्रयत्न असून सहा जागा लढवण्यासाठी काँग्रेसही आग्रही आहे. भाजपकडे असलेल्या संख्याबळानुसार भाजप तीन जागा सहज निवडून आणू शकणार असले तरी त्यांच्याकडूनही चौथ्या जागेसाठी प्रयत्न सुरु आहेत. भाजपला चौथी जागा जिंकण्यासाठी अपक्षांचीच जुळवाजुळव करावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com