esakal | शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा; केळी दरात सुधारणा 
sakal

बोलून बातमी शोधा

Some relief to farmers improvement in banana prices

केळी दरात तीन रूपयांनी वाढ 
कोरोनामुळे केळीची मागणीत प्रचंड प्रमाणात घट झाली होती. सरकारने 20 एप्रिल नंतर शेतमालाला लॉकडाऊनमध्ये सुट दिली आहे. तसेच रमजान मासारंभ सुरू झाल्याने केळी दरात सुमारे तीन रुपये वाढ झाली आहे. 
- सुयोग शंकर झोळ, केळी उत्पादक, वाशिंबे, ता. करमाळा

शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा; केळी दरात सुधारणा 

sakal_logo
By
राजाराम माने

केतूर (ता. करमाळा, जि. सोलापूर) : केळी दरात मागील दोन ते तीन दिवसांत चांगली सुधारणा होत असून, दर्जेदार केळीला उत्तर भारतातून चांगला उठाव आहे. सध्या केळीची दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्‍मिर येथे पाठवणूक सुरवात झाली आहे. 

टेंभुर्णी (ता. माढा), कंदर, वाशिंबे, उमरड, शेटफळ, चिकलठाण, वांगी (ता. करमाळा) भागातून सध्या दररोज 50 ट्रक (एक ट्रकची क्षमता 10 टन) केळीची पाठवणूक उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्‍मिर येथे ट्रकद्वारे होत आहे. केळीचे दर मागील आठवड्यात 4 ते 5 रुपये किलो असे होते. परंतु येत्या आजपासून रमजान मासारंभ होत असल्याने उत्तर भारतात केळीची मोठी मागणी सुरू झाली आहे. परिणामी दरात सुधारणा झाली असून 7 ते 8 रुपये किलो दर शिवार खरेदीत मिळत आहेत. 

आंध्र प्रदेशातील केळी संपल्याचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होत आहे. आंध्र प्रदेशातील केळीचा हंगाम संपला आहे. तेथील केळीची पाठवणूकही उत्तर भारतात अधिकची होत असते. आंध्र प्रदेशातील केळी संपल्याने त्याचा लाभ जिल्ह्यातील केळी पुरवठादारांना होत आहे. सध्या उजनी परिसरात निर्यातक्षम केळी उपलब्ध होत आहे, अशी माहिती केळीचे खरेदीदार सनी ईंगळे (फलटण, जि. सातारा) यांनी दिली.