तणावमुक्ती व नवा उत्साह देणारे खेळ कधी सुरू होणार ? क्रिडा क्षेत्राला प्रतिक्षा

sports2.jpg
sports2.jpg

सोलापूरः शहरातील क्रिडा चळवळीला अजूनही बसलेला ब्रेक कायम आहे. क्रिडा स्पर्धा, खेळांडुचा नियमित सराव व प्रशिक्षकांचे मार्गदर्शन या बाबत लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर देखील अद्याप कोणतीच सुरुवात झालेली नाही. जीम व योगा केंद्राप्रमाणे क्रिडा उपक्रम सुरू होण्याची गरज आहे. 

शहरात क्रिडा स्पर्धा अगदी मोठ्या प्रमाणात होत असतात. शहरातील पार्क मैदान, होम मैदान, नेहरू नगर, वल्याळ क्रिडांगण, दयानंद कॉलेज, आसावा स्पोर्ट मैदानासोबत शहरातील शाळांची मैदाने मोठ्या संख्येने उपलब्ध आहे. या मैदानात विद्यार्थी व खेळाडू सातत्याने सराव करत असतात. तसेच प्रशिक्षक देखील अनेक जिल्हा व तालुका स्तरावर स्पर्धाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी उन्हाळी व नंतर पावसाळी क्रिडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. विद्यार्थी व खेळाडूंना घराबाहेर स्पर्धा तर सोडाच पण सरावासाठी देखील बाहेर पडता आले नाही. 

अनेक खेळांडूची त्यांची नेहमीच्या सरावाच्या मैदानावर जाण्यास बंदी होती. कोरोना आजारात मानसिक तणाव मुक्ती, प्रतिकार क्षमता व शारिरीक संतुलन हे मुद्दे महत्वाचे ठरले पण या तीनही गोष्टीसाठी पुरक ठरलेल्या खेळांना मात्र अद्याप परवानगी मिळाली नाही. त्यानंतर जीम व योगा केंद्रांना सुरू करण्याची परवानगी मिळाली. पण क्रिडा प्रकारांबद्दल अद्याप निर्णय होणे बाकी आहे. वैयक्तिक सरावाचे काम काही खेळाडू घरी करत आहेत. काही जण अनलॉकमध्ये वार्मअप व व्यायाम करीत आहेत. शहरातील जिल्हा, विभाग व राज्यस्पर्धाची तयारी करणाऱ्या खेळाडूंचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील मनपाच्या तीन जलतरणिका आहेत. या जलतरणिका बंद आहेत. शहरातील अनेक नामंवत जलतरणपटूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. 
या शिवाय शहरात विवीध क्रिडा प्रकाराच्या बाबतीत प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकांची मोठी संख्या आहे. अनेक प्रशिक्षक तर या प्रशिक्षण कामावर स्वतःची उपजिविका करतात. उपजिविका करणारे हे प्रशिक्षक कोरोना संकटात बेकारीच्या संकटात सापडले आहेत. कराटे प्रशिक्षणात काम करणाऱ्या प्रशिक्षकांची संख्या खुप अधिक आहे. त्यांना लॉकडाउनचे मोठे नुकसान भोगावे लागले आहे. 

सोलापूर क्रिडा चळवळ 
महाराष्ट्र ऑलंपिक मान्यताप्राप्त क्रिडा असोसिएशनची संख्या ः 42 
नियमित सराव करणारे खेळांडु ः 1000 
प्रशिक्षकांची संख्या ः 500 


नियमाचे पालन करून खेळ सरावा सूरू व्हावा 
क्रिडा प्रकार हा कोरोनाच्या व घरी बसून राहणाऱ्यासाठी तणावमुक्ती, शारिरीक संतुलन व सकारात्मक उर्जेसाठी उपयुक्त आहेत. कोरोना नियमांचे पालन करून क्रिडा सरावाला परवानगी मिळणे गरजेचे आहे. 
- प्रकाश भुतडा, अध्यक्ष, स्पोर्टस पॅव्हेलीयन, सोलापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com