esakal | एसटी- कारची समोरसमोर धडक; बार्शी पंचायत समितीमधील पाच ठार
sakal

बोलून बातमी शोधा

Vairag Accident.jpg

एसटी- कारची समोरसमोर धडक; बार्शी पंचायत समितीमधील पाच ठार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर- बार्शी रोडवरील राळेरास ते शेळगाव (आर) दरम्यान शुक्रवारी (ता. २१) सकाळी १० च्या सुमारास एसटी बस आणि क्रुझर जीपची समोरसमोर धडक झाली. यामध्ये जीपचा चक्काचूर झाला असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात जखमी झालेल्या पाच जणांना उपचारासाठी तातडीने हलवण्यात आले आहे. मृत हे बार्शी पंचायत समितीमधील कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत असून सोलापूर येथे बचत गटाच्या कार्यक्रमासाठी येत असल्याचे समजत आहे. मात्र याबाब अधिकृत माहिती समजलेली नाही.
एसटी बस बार्शिकडे तर जीप सोलापुरकडे येत असताना सकाळी 10 च्या सुमारास अपघात झाला आहे.

यामध्ये एसटीमधील १२ ते १५ जण जखमी झाले आहेत. परिसरातील नागरिकांनी अपघातग्रस्ताना मदत केली. आता सोलापूर आगारातील अधिकारी घटनास्थळी निघाले आहेत. अपघात झाल्याची माहिती मिळाली असून त्याठिकाणी जात असल्याचे आगार प्रमुख श्री. दळवी यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.
खड्ड्यामुळे वाढले अपघात 
सोलापूर- बार्शी हा रस्ता मागील काही वर्षांपासून खड्डेमय झाला आहे. अनेकांनी खड्डे बुजावण्याची मागणी केली, मात्र खड्डे बुजवले गेले नाहीत. काही दिवसांपूर्वी याच रस्त्यावर झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. आता हा अपघात खड्ड्यामुळेच झाल्याची चर्चा त्याठिकाणी होती.

go to top