राज्यस्तरीय त्रिसदस्यीय तज्ञ समितीची बार्शीला भेट 

प्रशांत काळे
रविवार, 12 जुलै 2020

कोरोनाबाधित रूग्णांसाठी उपचार पद्धती बाबत येथील सुश्रुत हॉस्पिटल,जगदाळे मामा हॉस्पिटल मधील डॉक्‍टरांना बरोबर चर्चा केली व मार्गदर्शन केले. उपलब्ध सुविधा याची माहिती घेतली. तेथे उपलब्ध असलेल्या हायफ्लो ऑक्‍सिजन पध्दतीबद्दल व इतर सुविधा बाबत समाधान व्यक्त केले. 

बार्शी(सोलापूर)ः बार्शी शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय तीन तज्ञ डॉक्‍टरांची नियुक्त केलेल्या समितीने डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून कार्यरत असलेल्या जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी आणि सुश्रुत हॉस्पिटल या रुग्णालयांची भेट देऊन पाहणी केली. 

हेही वाचाः अंत्यसंस्कारास गेलेले बापलेक कोरोना पॉझिटिव्ह निघाले; या गावातील 14 नातेवाईक गेले विलगीकरण कक्षात 

कोरोनाबाधित रूग्णांसाठी उपचार पद्धती बाबत येथील सुश्रुत हॉस्पिटल,जगदाळे मामा हॉस्पिटल मधील डॉक्‍टरांना बरोबर चर्चा केली व मार्गदर्शन केले. उपलब्ध सुविधा याची माहिती घेतली. तेथे उपलब्ध असलेल्या हायफ्लो ऑक्‍सिजन पध्दतीबद्दल व इतर सुविधा बाबत समाधान व्यक्त केले. 

हेही वाचाः लॉकडाउनच्या भीतीने नागरिकांची बाजारात केली किराणा सामानाची खरेदी 

ही समिती राज्य शासनाच्या सुचनेनुसार वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे संचालक डॉ.तात्यासाहेब लहाने यांनी समितीची स्थापना केली आहे. समितीमध्ये अध्यक्ष म्हणून पुण्याच्या बी.जे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा.डॉ.शशिकला सांगळे, सदस्य म्हणून लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.व्यंकटेश जोशी आणि नांदेडच्या श्री.शं.च.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्रा.डॉ.विजय कापसे यांचा समावेश आहे. 
समितीमधील डॉक्‍टर औषधवैद्यकशास्त्र,बधिकरणशास्त्र आणि छाती व श्वसनविकारशास्ञ विषयाचे तज्ञ आहेत. यावेळी तज्ञ समिती सोबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले उपस्थित होते. महात्मा फुले जनआरोग्य योजना सुश्रुत हॉस्पिटलला त्वरित सुरू करण्याबाबत समितीने सूचना केली. समितीने बार्शी तालुक्‍यात कोविड-19 च्या परिस्थितीचा आढावा घेऊन वाढत्या मृत्यूदराची समिक्षा केली. 
कोविड रूग्ण असणाऱ्या दवाखान्यांना भेटी देऊन उपचार पद्धतीची माहिती घेतली. ही समिती शासनास अहवाल सादर करणार आहे. तालुक्‍यातील कोविड19 च्या परिस्थिती बाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष जोगदंड,ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षका डॉ.शीतल बोपलकर यांनी समितीला आढावा सादर केला. 
 

संपादनः प्रकाश सनपूरकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State level three-member committee of expert doctors visits Barshi