महापालिकेचे कर्मचारी निवृत्ती वेतनाच्या लाभापासून वंचित

A statement has been submitted to the commissioner on behalf of the deprived front that the employees of Solapur Municipal Corporation are deprived of pension benefits
A statement has been submitted to the commissioner on behalf of the deprived front that the employees of Solapur Municipal Corporation are deprived of pension benefits

सोलापूर : वेळोवेळच्या शासन निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याने महापालिकेचे कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. तेव्हा निर्णयांची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे केली आहे. 

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 31 ऑक्‍टोबर 2005 च्या शासन निर्णयानुसार 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त झालेल्या सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना जुनी निवृत्ती वेतन योजना बंद करुन नवीन अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली. त्यानुसार महापालिकेने नवीन योजना लागू केली. नोव्हेंबर 2005 सेवेत रुजू होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सेवकांना मूळ वेतन व महागाई भत्ता या रक्कमेच्या 10 टक्के इतके अंशदान देण्यात यावे. ही रक्कम वेतनातून दरमहा वजा करुन घेतली जाईल. राज्य शासन समतुल्य अंशदान देईल, असा नियम आहे. यानुसार महापालिकेने दरमहा सेवकांच्या वेतनातून कपात केली. शासन निर्देशानुसार हिस्सा जमा करणे आवश्‍यक असताना महापालिकेने तसे केले नाही. सन 2005 ते 2017 अखेर महापालिकेचा हिस्सा जमा करण्यात आला नाही.

केंद्र शासनाने अंशदान निवृत्ती योजनेत समावेश असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत समावेश होईल असा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्य शासनाला निर्देश देण्यात आले आहेत. पण महापालिकेत हिश्यासंदर्भात हिशेब नसल्याने कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय योजनेत समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे हे कर्मचारी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. यामुळे वेळोवेळच्या शासन निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे आदेश होणे आवश्‍यक आहे, असे निवेदनात नमूद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com