
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भवामुळे उद्धभवलेल्या परिस्थितीत नागरिकांना घरा बाहेर पढणे अवघड झाले आहे. त्यातच पाणी टंचाईला समोर जाण्याची वेळ ग्रामस्थांवर येण्याची शक्यता आहे.
पांडे (सोलापूर) : म्हसेवाडी तलावातून पांडे (ता. करमाळा) गावाला पाणी पुरवठा होत आहे. परंतु या तलावात सध्या १५ दिवस पुरेल ऐवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे कोरोनाच्या सावटात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भवामुळे उद्धभवलेल्या परिस्थितीत नागरिकांना घरा बाहेर पढणे अवघड झाले आहे. त्यातच पाणी टंचाईला समोर जाण्याची वेळ ग्रामस्थांवर येण्याची शक्यता आहे.
गेल्यावर्षी दुष्काळी परिस्थिती होती. त्यात पाऊसाळाच्या शेवटी परतीचा पाऊस झाल्याने हा तलाव ७० टक्के भरला होता. शेतकरीनी रब्बी हंगामासाठी या तलावातील पाणी उपास केला. त्यावेळी तलावात ३० टक्के पाणी साठा शिल्लक होता. शेतकऱ्यांनी बेसुमार पाणी उपास सुरू केल्याने जनावरांना व ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.
ग्रामपंचायतीने संबधित आधीकारी यांना गावाला पाणी पुरवठा करणारा म्हसेवाडी तलावातील पाणी राखीव ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी सह्याचे निवेदन दिले होते. ग्रामपंचायतीने लेखी स्वरूपात संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत पत्रही दिले होते. गेल्यावर्षी दुष्काळ परिस्थितीमध्ये ग्रामस्थांना ६० रूपये बॅलरप्रमाणे पाणी विकत घेण्याची वेळ आली होती. या वर्षीही तीच वेळ येती की काय आशी भीती ग्रामस्थांना वाटु लागली आहे. याकडे संबधित आधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने बेसुमार पाणी उपसा होत आहे.
पाणी उपसा थांबवावा...
कोरोना व्हायरस भयानक असून ग्रामस्थांना पाणी टंचाईत बाहेर पडावे लागेल. म्हसेवाडी तलावात पाणी रहावे म्हणून येथील विज पुरवठा खंडीत करावा व बेसुमार पाणी उपसा बंद करावा, अशी मागणी सरपंच मंगल आनारसे यांनी केली आहे.