महत्त्वाची बातमी : शाळा सुरु करताना पालक, शिक्षक, ग्रामपंचायतीवर 'ही' असणार जबाबदारी

अशोक मुरुमकर
Tuesday, 16 June 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्यासाठी सरकारने निर्णय घेतला आहे. हे निर्णय घेतानाह शिक्षक आणि पालकांवर काही जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. यामध्ये पालकांनी मुलांना शाळेत पाटवताना मास्क घालून पावावे लागणार आहे. याबरोबर पाण्याच्या बाटल्या देणे, हात रुमाल व चटई द्यावी लागणार आहे.

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्यासाठी सरकारने निर्णय घेतला आहे. हे निर्णय घेतानाह शिक्षक आणि पालकांवर काही जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. यामध्ये पालकांनी मुलांना शाळेत पाटवताना मास्क घालून पावावे लागणार आहे. याबरोबर पाण्याच्या बाटल्या देणे, हात रुमाल व चटई द्यावी लागणार आहे. 
महाराष्टात शाळा सुरु करण्यासाठी टप्या- टप्याने प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याविषयी स्थानिक पातळीवर प्रशासन, ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीने एकत्रित निर्णय घेणे आवश्‍यक आहे. शाळा सुरु करण्यापूर्वी एक महिना गावामध्ये कोणताही कोविड १९ चा रुग्ण आढळला नाही याची खात्री करावी लागणार आहे. त्यानुसार शाळा सुरु कराव्या लागणार आहेत. 
अशा करा शाळा सुरु (संभाव्य वेळापत्रक)

. क्र.

इयत्ता

दिनांक

1

नववी, दहावी व बारावी

 
जुलै २०२० पासून
2 सहावी ते आठवी ऑगस्ट २०२० पासून
3

तीसरी ते पाचवी

सप्टेंबर २०२० पासून
4

पहिली व दुसरी

शाळा व्यवस्थापन समितीने निर्णय घ्यावा, टीव्ही, रेडिओवर उपलब्ध होणारे शैक्षणिक कार्यक्रम दाखवण्यासाठी पालकांना प्रवृत्त करावे

5

अकरावी

दहावीच्या निकालावर आधारित अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर

                    

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शाळा सुरु करण्याबाबत इयत्तानिहाय सरकारने संभाव्य वेळापत्रक तयार केले आहे. मात्र, स्थानिक पातळीवरील परस्थितीनुसार यात बदल करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. नवीन प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्यास सरकारने सांगितले आहे. शाळा सुरु करताना पालक, शिक्षक, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत यांच्यावर काही जबाबदाऱ्या दिल्या आहेत.
पालकांची जबाबदारी : 
मुलांना शाळेत पाठवताना मास्क घालून पाठवावे, पाण्याच्या बाटल्या देणे, हात रुमाल व छोट्या चटई देणे, मुलांना मास्कची सवय लावणे, तोंडाला स्पर्श न करण्याची सवय लवणे, हात साबणाने धुण्याची सवय लावणे, घरातील मोबाईल फोन आवश्‍यक वेळेसाठी मुलांना पालकांच्या नजरेखालीच उपलब्ध करुन द्यावेत, पहिली व दुसरी च्या मुलांनी प्रत्यक्ष शाळा सुरु होईपर्यंत घरातून अभ्यास करावा. पालकांनी पाल्य आजारी असल्यास शाळेत पाठवू नये
शिक्षकांची जबाबदारी : 
सर्व शिक्षकांनी स्थानिक प्रशासनाची योग्य ती परवानगी घेऊन शाळा सुरु होण्यापूर्वी शाळेच्या कार्यक्षेत्रामध्ये उपस्थित रहावे. जे शिक्षक कोरोना व्हायरसच्या कामकाजासाठी कार्यरत आहेत, त्यांनी संबंधित प्रशासनाने कार्यमुक्त केल्यानंतर होम क्वारंटाईनची अट असल्यास त्याचे योग्य ते पालन करुनच आवश्‍यक त्या प्रमाणपत्रासह संबंधित शाळेत कामकाजासाठी उपस्थित रहावे. यासाठी सर्वजनिक व खासगी वाहन व्यवस्थेचा वापर करावा. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित राहिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या मदतीने अध्यन होण्यासाठी मदत करावी.
आरोग्य विभागाची जबाबदारी :
आरोग्य विभागाने आवश्‍यकतेप्रमाणे शिक्षकांचे व मुलांचे थर्मल स्क्रिनिंग व वैद्यकीय तपासणी करुन घेण्यासाठी नियोजन करावे. किमान पाच किमाल १० शाळांकरीता फिरते आरोग्य तपासणी केंद्र कार्यरत ठेवावे. 
जिल्हा परिषद व महापालिकेला सूचना :
शाळेचा परिसर स्वच्छ ठेवावा. साबण व पाण्याची पुरशी व्यवस्था करावी. शाळेचा परिसर स्वच्छ व निर्जंतुकिरण करावा, सॅनिटायझर, मास्क व आश्‍यक निर्जंतुकीकरण साहित्य जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करुन द्यावे. तसेच १५ व्या वित्त आयोग व ग्रामपंचायत निधीचा योग्य वापर करावा.
ग्रामपंचायतीची जबाबदारी :
फर्निचर बाजूला करुन फरशी साबणाने स्वच्छ धुणे, निर्जंतुकीकरण करणे, शाळेत वीज व पाणी पुरवठा करणे, बाहेर गावातून येणाऱ्या शिक्षकांची तपासणी करुन घेणे, एखाद्या शाळेतील सर्वच शिक्षण कोव्हिड १९ च्या कामकाजासाठी असतील तर स्थानिक पातळीवर नियोजन करणे यासह इतर जबाबदाऱ्या दिल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The story of government gave to parents and teachers responsible for starting schools