esakal | केवळ पोस्टामुळे हुकली ‘क्लास वन’ची संधी; अन्‌ आता आहेत...
sakal

बोलून बातमी शोधा

The story of how Talathi was appointed in Solapur district

स्पर्धा परिक्षा देऊन क्लास वन अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असतं. त्यासाठी रात्रीचा दिवस करुन उमेदवार अभ्यास करतात. ऐवढा अभ्यास करुन संधी मिळाली तर त्याचा केवढा आनंद असतो. पण एखाद्याला परीक्षेत यश येऊन सुदधा काही कारणामुळे ते पद नाही मिळाले तर? 

केवळ पोस्टामुळे हुकली ‘क्लास वन’ची संधी; अन्‌ आता आहेत...

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर : स्पर्धा परिक्षा देऊन क्लास वन अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असतं. त्यासाठी रात्रीचा दिवस करुन उमेदवार अभ्यास करतात. ऐवढा अभ्यास करुन संधी मिळाली तर त्याचा केवढा आनंद असतो. पण एखाद्याला परीक्षेत यश येऊन सुदधा काही कारणामुळे ते पद नाही मिळाले तर? कल्पना करा काय वाटतं असेल... असाच प्रकार उस्मानाबाद येथील एका गावकामगार तलाठ्याच्याबाबत झाला आहे. त्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळाले. त्यानंतर मुलाखतीला निमंत्रीत केले. मात्र पत्रच वेळेत मिळाले नाही. त्यामुळे संधी हुकल्याचे ते सांगत आहेत.

सोलापूर जिल्ह्यात संध्या ते कार्यतर आहेत. विवेक कसबे यांची ही स्टोरी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक, विक्रीकर निरीक्षक आदीच्या परीक्षा ते देत होते. २००७ मध्ये त्यांनी महिला व बाल विकास विभाग अधिकारी या पदासाठी परीक्षा दिली. त्यात ते उतीर्ण झाले. ओपनमधून त्यांनही ही परिक्षा दिली होती. या परीक्षेत ते उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आले. तेव्हा आताच्या सारखे मोबाईल नव्हते. त्यामुळे त्यांना मुलाखतीसाठी बोलावलेले लेटर पोस्टाने आले. त्यांच्या हातात जेव्हा लेटर मिळाले तेव्हा मुलाखतीची तारीख संपून गेली होती. त्यानंतर त्यांनी एमपीएससीकडे न्याय मागितला होता.

कसबे यांचे इंजिनीअरिंग झाले आहे. त्यानंतर त्यांनी बीएड, एमएड व एमफील केले. त्यांनी काही दिवस वैरागमध्ये ‘मानसशास्त्र आणि तत्वज्ञान’ विषय शिकवण्यासाठी होते. त्यांचे शिक्षण पुणे, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यात झाले आहे. एमफील झाल्यानंतर त्यांना वैरागमधील महाविद्यालयात  त्यांना लेक्चर म्हणून बोलावण्यात आले. मात्र, कायम विना अनुदानीत महाविद्यालय असल्याने त्यांचे त्यात मन रमले नाही. खचून न जाते त्यांनी शासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, काहीच न मिळाल्यापेक्षा किमान जे हाती पडेल ते स्विकारण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

त्यातच त्यांनी २०११ मध्ये उस्मानाबाद आणि सोलापूरसाठी तलाठी या पदासाठी अर्ज केला. त्या परिक्षेत त्यांना दोन्हीही ठिकाणी यश मिळाले. त्यानंतर त्यांनी सोलापूर स्विकारले. मात्र, केवळ पोस्टामुळे आपली क्लास वनची संधी हुकल्याची खंत त्यांच्या मनात कायम आहे. सध्या मी माझ्या पदावर समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी करमाळा व माढा तालुक्यात सेवा केली आहे. म्हैसगाव, वाकाव, रिधोरे आदी गावात सेवा केली आहे. त्यांचे वडील जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत. भाऊ, बहिण व वहिनी जिल्हा परिषदेच्या शिक्षकी आहेत.