विद्यार्थी फार्मसी, डिझायनिंग व बॅंकिंग सोबत आवडीच्या क्षेत्रात घेत आहेत करिअरचा शोध 

career.jpg
career.jpg
Updated on

सोलापूर ःबारावीनंतर नियमित पदवी व पदवीका अभ्यासक्रमाच्या पारंपारिक चौकटीच्या बाहेर जाऊन अनेक विद्यार्थी नव्या शिक्षण क्रमांच्या वाटा शोधत क्रिएटीव्ह एज्युकेशन व नॉलेज विथ स्किल या ट्रेंडला प्राधान्य देत आहेत. फार्मसी, डिझायनिंग व बॅंकिंगसह अनेक नविन अभ्यासक्रम निवडण्याकडे विद्यार्थ्याचा कल वाढला आहे. 

दहावी व बारावीचे निकाल लागले की विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाचे वेध लागतात. कला, वाणिज्य व विज्ञान या शाखाकडे प्रवेश घेतला जातो. अकरावीला या शाखांना प्रवेश होतो. तर बारावीनंतर पारंपारीक पदवीचे बीएससी, बीकॉम व बीए हे अभ्यासक्रम असतात. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची मेडिकल व इंजिनीअरींग शाखेच्या पदवीकडे जाण्याची तयारी असते. त्यामध्ये आता बदल होऊ लागला आहे. 

क्रिएटीव्ह एज्युकेशनकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. यामध्ये इंजिनीअरींगच्या तुलनेत आर्कीटेक्‍चर शिक्षणाला प्राधान्य दिले जात आहे. या शिवाय ऍनिमेशन, सीएफएक्‍स हे अभ्यासक्रम यामध्ये असतात. तसेच पांरपारिक पदवी अभ्यासक्रम सोडून डिझाईनिंग क्षेत्रात देखील विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. अगदी चित्रकलेसारख्या क्षेत्रात जे.जे.स्कुल ऑफ आर्टस सारख्या चित्रकला महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी शहरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवेश परिक्षेची तयारी करत आहेत. 
इंजिनीअरींगच्या तुलनेत मोठ्या संख्येने आर्किटेक्‍चर क्षेत्राला प्राधान्य आहे. मेडिकलच्या स्पर्धेत न उतरता फार्मसीत करीअर संधी शोधल्या जात आहेत. हॉटेल मॅनेजमेंटच्या शिक्षण हे देखील विद्यार्थ्यासाठी अग्रकमांकाचे बनले आहे. 
वाणिज्य शाखेत बॅंकींगच्या अनेक ऑनलाइन सर्व्हिस शिक्षणाला विद्यार्थी मोठे प्राधान्य देत आहेत. कंपनी सेक्रेटरी या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्याची पसंती आहे. विशेषतः मुलींचा बॅंकींग क्षेत्रात करिअर करण्याकडे मोठा भर आहे. ऑनलाइन बॅंकींग सर्व्हीसेस, बॅंकांचे ऑनलाइन पेमेंट गेटवे, बॅंकिंग सॉफ्टवेअर, आउट सोर्सींग आदी अनेक क्षेत्रे उघडली आहेत. त्यासाठी उत्तम स्किल असलेल्या विद्यार्थ्यांना संधी आहे. जीएसटी सेवेसाठी लागणारे शिक्षण विद्यार्थी मिळवू लागले आहेत. वाणिज्य शाखेच्या विद्यार्थीनींनी या ऑनलाइन बॅंकींग क्षेत्रातील शिक्षणाला प्राधान्य दिले आहे. पदवी करताना संमातरपणे सॉफ्टवेअर स्किल डेव्हलप करता येतात. 
कला शाखेला आता दुय्यम समजण्याचे दिवस गेले आहेत. कला शाखेचे विद्यार्थी इंग्रजी भाषा शिक्षण, चित्रकला, स्पर्धा परिक्षा आदी अनेक क्षेत्रात करीअर करण्याच्या दृष्टीने प्रवेश घेत आहेत. 

नविन अभ्यासक्रमाचा शोध 
विद्यार्थी अनेक क्रिएटीव्ह एज्युकेशन व नॉलेज विथ स्किल या आधारावर पांरपारिक शिक्षणाचा परिघ ओलांडून त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करीअर करण्यास प्राधान्य देत आहेत. 
- प्रा.डॉ. गणेश मुडेगावकर, करीअर समुपदेशक 


इंग्रजी भाषा करिअरची निवड 
माझे मित्र विज्ञान शाखेचा आग्रह करत असताना मी इंग्रजी माध्यमातून घेत इंग्रजी भाषा शिक्षणासाठी इफ्लु (इंग्लिश अँड फॉरेन लॅंग्वेज युनीव्हरसिटी) प्रवेश परिक्षा दिली. आता या संस्थेत इंग्रजी सोबत स्पॅनिश भाषा देखील शिकलो आहे.
- ओम वाघमोडे, जुळे सोलापूर 

चित्रकलेच्या माध्यमातून संधीचा शोध 
चित्रकलेची आवड जपत कला शाखेचे शिक्षण घेत देशातील नामवंत चित्रकला महाविद्यालयात पुढील शिक्षण घेण्याची तयारी केली आहे. क्रिएटिव्ह फॉर्म म्हणून चित्रकलेत करिअर करण्याचे ठरवले आहे. 
- श्‍वेता शिवगुंडे, भवानी पेठ सोलापूर. 

डिझायनिंगमध्ये अनेक संधी 
मी डिझार्यनिंग मध्ये करिअर करण्याचे ठरवले होते. कोणतेही पांरपारिक पदवी शिक्षणापेक्षा डिझाईनिंगमध्ये काही तरी नवे करता येईल. त्यासाठी मी एमआयटी एडीटी (आर्ट डिझाईन ऍन्ड टेक्‍नॉलॉजी) विभागात प्रवेश घेतला आहे. 
- अपुर्वा शहाणे, मुरारजी पेठ सोलापूर. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Farmers in Mohol taluka face a severe drought-like situation as rainfall remains inadequate, affecting crops, water availability, fodder and dairy production.
Mohol Police conduct a route march across the city and Shetphal ahead of Ganeshotsav to maintain law and order.
Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Marathi News Esakal
www.esakal.com