साखर कारखान्यातील वजन काट्यांच्या  तपासणीसाठी भरारी पथकाची स्थापना 

प्रमोद बोडके
Sunday, 17 January 2021

साखर कारखाना हद्दीतील पोलिस स्टेशनचे ठाणे अंमलदार, लेखा परीक्षक पी. आर. शिंदे (पंढरपूर, सांगोला, माळशिरस), लेखा परीक्षक एन. डी. माडे (बार्शी, माढा, करमाळा, मोहोळ), लेखा परीक्षक के. आर. धायफुले (उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा) आणि शेतकरी प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे.

 
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या ऊस वजन काट्यांची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी भरारी पथकाची स्थापना केली आहे. याबाबतचे आदेश जारी केले आहेत. भरारी पथकात संबंधित तालुक्‍यातील तहसीलदार हे प्रमुख असतील. वैध मापन शास्त्र विभागाचे वजनमापे निरीक्षक एस. के. बागल हे सदस्य सचिव तर सदस्य म्हणून काम करणार आहेत. 
साखर कारखाना हद्दीतील पोलिस स्टेशनचे ठाणे अंमलदार, लेखा परीक्षक पी. आर. शिंदे (पंढरपूर, सांगोला, माळशिरस), लेखा परीक्षक एन. डी. माडे (बार्शी, माढा, करमाळा, मोहोळ), लेखा परीक्षक के. आर. धायफुले (उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा) आणि शेतकरी प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे. भरारी पथकाने स्वयंस्फूर्तीने कारखाना स्थळावर अचानक भेटी देऊन वजन काट्यांची तपासणी करावी, शेतकऱ्यांना वजनाची पावती योग्य प्रकारे दिली जाते का? याची खात्री करावी, वजन काट्याबाबत गैर प्रकार होत असल्याचे किंवा पोलीस तक्रार असेल तर तपासणी करून कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिल्या आहेत. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugar factory weight thorns Establishment of Bharari Squad for investigation