करमाळ्यातील आदिनाथ कारखान्याच्या कामगारांची आत्महत्या

Suicide workers of Adinath factory workers in Karmala taluka
Suicide workers of Adinath factory workers in Karmala taluka

करमाळा (सोलापूर) : शेलगाव भाळवणी (ता. करमाळा) येथील श्री अदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे कामगार राजेंद्र बलभीम जाधव (वय 40) यांनी आर्थिक अडचणीमुळे शेलगाव वा येथील राहत्या घरी पत्र्याच्या ऑगलला दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे. 
करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ कारखाना शिवसेनेच्या कार्यकर्त्या बागल गटाच्या ताब्यात आहे. या पार्श्वभूमी शिवसेनेच्या नेत्या रश्मी बागल, दिग्विजय बागल यांच्या विद्यानगर येथील त्यांच्या निवसस्थानी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालय, कारखानास्थळावर व शेलगांव (वा) येथे मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मृत राजेंद्र जाधव हे कारखान्याच्या इंजिनिअरिंग विभागात काम करत होते. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या डिसेंबर 2019 आखेर 46 महीन्याच्या पगारी थकल्या आहेत. याशिवाय यावर्षी कारखान्याचे गाळपही बंद ठेवण्यात आले आहे. तसेच कामगारांना कामावरून ब्रेक देण्यात आला आहे. त्यामुळे महिनाभरापासून कामगारांनी कारखान्याच्या गेटसमोर आंदोलन सुरू केले आहे. कारखान्याच्या संचालकामध्येही अनेक मुद्दावरून मतभेद आहेत.  आत्महत्या केलेल्या जाधव यांच्या घरी कारखान्याच्या पगारी थकल्यामुळे आर्थिक चणचण भासत होती. तसेच चार- पाच दिवसांपासून आर्थिक अडचणीबाबत ते अस्वस्थ होते, असे त्यांचे नातेवाईक सांगत आहेत. करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले असून या ठिकाणी मोठ्या संख्येने कामगार व नागरिकांनी गर्दी केली आहे. कामगारांची चिडलेली मानसिकाता बागल निवसस्थान,  उपजिल्हा रुग्णालय, करमाळा शहर व आदिनाथ सह साखर कारखाना येथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com