esakal | ब्रेकिंग ! मोहिते-पाटील गटाच्या सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती 
sakal

बोलून बातमी शोधा

solapurZP

जिल्हा परिषदेतील मोहिते-पाटील गटाच्या सहा सदस्यांविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्यापुढे सुरू असलेल्या पक्षभंग सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यामुळे मोहिते-पाटील गटास दिलासा मिळाला असल्याची माहिती धैर्यशील मोहिते- पाटील यांनी दिली. या वेळी डॉ. नितीन खराडे उपस्थित होते. 

ब्रेकिंग ! मोहिते-पाटील गटाच्या सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती 

sakal_logo
By
शशिकांत कडबाने

अकलूज (सोलापूर) : जिल्हा परिषदेतील मोहिते-पाटील गटाच्या सहा सदस्यांविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्यापुढे सुरू असलेल्या पक्षभंग सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यामुळे मोहिते-पाटील गटास दिलासा मिळाला असल्याची माहिती धैर्यशील मोहिते- पाटील यांनी दिली. या वेळी डॉ. नितीन खराडे उपस्थित होते. 

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोहिते-पाटील गटाच्या सहा सदस्यांनी विरोधात मतदान केले म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांनी त्या सहा जणांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे सदस्यत्व रद्द करण्याबाबत तक्रार केली. याबाबत सदस्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयात सुनावणी झाली व उच्च न्यायालयाने आदेश पारीत केले. 

या आदेशामुळे समाधान न झाल्याने मोहिते-पाटील गटाच्या "त्या' सहा सदस्यांनी डॉ. आर. आर. देशपांडे,×डॉ. अभय अंतुरकर,×डॉ. अभिजित कुलकर्णी यांच्यामार्फत उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अचूकता तपासण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली व या सदस्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. 

या याचिकेची सुनावणी सोमवारी (ता. 16) घेण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने या सुनावणीला स्थगिती दिली आहे. स्थगिती देत संबंधित पक्षकारांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आहे. अशा प्रकारे जिल्हा परिषदेच्या मोहिते- पाटील गटाला दिलासा मिळाला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल