पालखी महामार्गाच्या तक्रारींबाबत प्रत्येक गावात ग्रामस्थांशी होणार चर्चा

palakhi.jpg
palakhi.jpg


अकलूज(सोलापूर): संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग संपादित जागांबाबत सर्व तक्रारी सोडविण्यासाठी प्रत्येक गावात बैठक घेणार असल्याची माहिती प्रांताधिकारी शमा पवार यांनी दिली. 

संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील अधिग्रहनातील अडचणी सोडवण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अधिकारी व नागरिकांची संयुक्त बैठक बोलावली होती. या बैठकीत नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक गावातील विवादित मुद्दे तेथे जाऊन सोडवण्याच्या सूचना आमदार मोहिते पाटील यांनी प्रांताधिकारी पवार व राष्ट्रीय महामार्ग संचालक एस. एस. कदम यांना दिल्या. संत तुकोबांचा पालखी मार्ग 45 मीटर रुंदीचा असून त्याचा नकाशा प्रत्येक गावात दिला जाईल. 

अधिग्रहीत केलेल्या जमिनीचा मोबदला त्या-त्या गावाच्या रेडीरेकनर दरानुसार दिला जातो. शेती व बिगरशेतीचा मोबदला देताना जास्तीत जास्त मोबदला मिळेल, असा प्रयत्न केल्याचे प्रांताधिकारी पवार यांनी सांगितले. धर्मपुरी येथील जिल्हा परिषद शाळा अधिग्रहीत केली असून त्याचा मोबदला जिल्हा परिषदेकडे वर्ग झाला आहे. तो आमच्याकडे येऊन पर्यायी व्यवस्था होईपर्यंत शाळा पाडू नये, असा आग्रह सरपंचांनी केला, तर आम्ही पैसे दिले आहेत; त्यामुळे आम्ही जास्त थांबू शकणार नसल्याचे श्री. कदम यांनी सांगितले. एकाच गावातील शेतीस मिळणाऱ्या रकमेत फार मोठी तफावत असून ती दूर करावी. काही गावात रेडीरेकनरनुसार मिळणारी रक्कम बाजारभावाच्या नगण्य आहे. तसेच तीन गुंठे प्लॉटमधील अर्धा गुंठाच शिल्लक असून तो पण घेऊन टाका, अशी मागणी एकाने केली तर आम्हाला तसे करता येत नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अधिग्रहन केल्यानंतर नगण्य जागा शिल्लक राहिल्याने अनेक लोक विस्थापित होणार असून अशा लोकांना प्रकल्पग्रस्त दाखला मिळावा, अशी मागणी केली. शेतकऱ्यांनी उपस्थित केलेले अनेक प्रश्र बरोबर असले तरी कायद्याच्या चौकटीमुळे अधिकारी हतबल व निरुत्तर झाले. 


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com