अक्कलकोटमध्ये प्रभागनिहाय नागरिकांची वैद्यकीय तपासणी मोहिम 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जुलै 2020

अक्कलकोट नगरपरिषदेच्यावतीने शहरात विविध प्रभागात सर्वेक्षण सुरू असून आजारी व संशयित नागरिकांची वैद्यकीय तपासणीसुद्धा करण्यात येत आहे. या वैद्यकीय तपासणीस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

अक्कलकोट(सोलापूर)ः अक्कलकोट परिसरात मागील काही दिवसात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता तातडीने प्रभाग सर्वेक्षणाचे काम शहरात सूरू करण्यात आले आहे. संभाव्य रुग्णसंख्येला आळा बसावा म्हणून नगरपरिषदेने हा निर्णय घेतला आहे. 

हेही वाचाः पंचवटी पतसंस्थेतर्फे कोविड योध्यांचा सन्मान 

अक्कलकोट नगरपरिषदेच्यावतीने शहरात विविध प्रभागात सर्वेक्षण सुरू असून आजारी व संशयित नागरिकांची वैद्यकीय तपासणीसुद्धा करण्यात येत आहे. या वैद्यकीय तपासणीस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
अक्कलकोट शहरात प्रभाग सात, आठ व नऊमध्ये सर्वेक्षण व वैद्यकीय तपासणी सुरू आहे. नगरसेविका सारिका पुजारी व सुभाष पुजारी यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग 8 येथील नागरिकांची आज आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रभाग 8 मधील दवाखाना चाळ, पागा चाळ, अरब गल्ली, उखळे गल्ली, फस्के गल्ली, नेहरू गल्ली, जुना राजवाडा परिसर व फत्तेसिंह चौक, मेन रोड, नडगिरे गल्ली आदी परिसरातील नागरीकांची तपासणी डॉ. राजेंद्रकुमार पाटील व डॉ. पंडीत पाटील यांनी केली. नागरिकांनी स्वत:ची तपासनी करून घेतली व प्रसासनाला सहकार्य केले. यावेळी स्वयंसेवक प्रकाश शिंदे, राजू शिंदे, प्रथमेश पवार, शेखर झिंगाडे, करण पुजारी, पंडीत पुजारी, विकी जाधव, सचिन पवार, कुमार पाटील, चेतन शिंदे, अस्लम बोरोटी, सैपन पटेल उपस्थित होते.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ward wise medical check-up campaign in Akkalkot