
दुपारी बारापर्यंत सर्व निकाल हाती लागण्याची शक्यता आहे. निकालानंतर मिरवणुका, सभा, फटाके उडविण्यासाठी बंदी आहे. आपला विजय शांततेत साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नातेपुते (सोलापूर ) : माळशिरस तालुक्यातील 44 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले असून 1 लाख 12 हजार 953 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सोमवारी सकाळी 8.30 वाजता माळशिरस येथील म्हसवड रोडवरील शासकीय गोदामात मतमोजणी सुरू होणार आहे. मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून १४ टेबलवर २० फेरीत सर्व मतमोजणी पूर्ण होईल, अशी माहिती तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी दिली.
सोलापूरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
प्रथम फेरीत शेंडेचींच, तोंडले, दसुर, बोंडले, कुसमोड. दुसऱ्या फेरीत भांब, येळीव, विजयवाडी, खळवे, विठ्ठलवाडी; तिसऱ्या फेरीत बिजवडी, शिंगोर्णी, गारवाड, बचेरी. चौथ्या फेरीत रेडे, पिरळे, गणेशगाव, कोथळे. पाचव्या फेरीत चाकोरे, तांबवे, लोणंद, बांगर्डे. सहावी फेरी विझोरी, मांडकी, जळभावी, शिंदेवाडी. सातव्या फेरीत एकशीव, गिरवी, पिंपरी, कळंबोळी. आठवी व नववी फेरी तांदूळवाडी, मोरोची, संग्रामनगर, संग्रामनगर व उंबरे (वे). दहावी व अकरावी फेरी फोंडशिरस, फडतरी, कुरबावी बोरगाव, माळखांबी. बारापासून पुढील फेऱ्या प्रथम अकलूजनंतर कोंडबावी, मांडवे, नातेपुते, मळोली. अशाप्रकारे मतमोजणी होणार आहे.
हे ही वाचा : ग्रामपंचायतींच्या मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण
दुपारी बारापर्यंत सर्व निकाल हाती लागण्याची शक्यता आहे. निकालानंतर मिरवणुका, सभा, फटाके उडविण्यासाठी बंदी आहे. आपला विजय शांततेत साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.