
सोलापूर : शहरात तेलुगू भवन उभारण्याच्या संदर्भात समाज बांधवांची मते जाणून घेण्यासाठी आज चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राला बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला. हे भवन सर्वांना उपयोगी ठरेल, अशा पध्दतीने उभारले जावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
हेही वाचाः सोलापूर ग्रामीणमध्ये 11 जणांचा मृत्यू
तेलुगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालय मंडळाच्या वतीने तेलुगू भवन बांधण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी शासनाकडून 93 लाख रुपये निधी मिळवून दिले आहेत. शहरातील सर्व समाजबांधवांच्या वतीने श्रीकृष्ण मंगल कार्यालय कमटम वसाहत येथे तेलुगू भवन बांधकाम विषयी चर्चासत्र आयोजित केले होते. सदर चर्चासत्रांमध्ये सर्व तेलगू भाषिक समाज बांधवांनी आपले विचार मांडले व तेलुगू भवन होत असल्याबद्दल प्रत्येकांनी आनंद व्यक्त केला. लवकरच तेलुगु भवनचे भूमिपूजन करण्याबद्दल सर्वांचे एकमत झाले.
हेही वाचाः रस्ता खोदाईने सोलापूरवासियांचे मोडले कंबरडे
यावेळी तेलुगू समाजाचे अध्यक्ष व सेक्रेटरी माजी अध्यक्ष जनार्दन कारमपुरी, देवेंद्र भंडारे, रामकृष्ण उदगिरी, नारायण काळपगार, प्रवीण मुसपेठ, राजकुमार सरवदे, दीनानाथ धुळम, अंबाजी गुर्रम, मुरलीधर आरकाल, माजी महापौर संजय हेमगड्डी, रामचंद्र जन्नू, प्रकाश कोंडम, व्यंकटेश कोंगारी, मेघनाथ येमूल, राजमहेद्र कमटम, पांडुरंग दिड्डी, कुमुदिनी अंकाराम, विठ्ठल बडगंची, संतोष उदगिरी, अंबादास बिंगी, यल्लप्पा येलदी, श्रीनिवास क्यातम, गोपीकृष्ण वड्डेपल्ली, देविदास गुंडेटी, गोवर्धन कमटम, श्रीनिवास विडप, भूपती कमटम, अंबादास कुडक्याल, रमेश कैरमकोंडा, रघुरामुलु कंदीकटला, लक्ष्मीनारायन कमटम, यशवंत इंदापूरे, तिरुपती परकीपंडला, मल्लेशम येमूल, दयानंद कोंडाबत्तीन, महाकांली येलदी, नारायण मेरगू, राहुल गंजी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम यांनी तर आभार संस्थेचे सचिव तिपण्णा गणेरी यांनी मानले. सूत्रसंचालन रेणुका बुधाराम व प्रभाकर भीमनाथ, मधुप्रिया महिन्द्रकर यांनी केले. सुरवातीस तेलुगू मातल्लिकी मल्लेपुलू दंडालू हे गीत सादर झाले. तसेच यावेळी ज्येष्ठ गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.