सोलापूर शहरातील  दहा हजार ऑटोचालकांचा कमाईसाठी अजुनही संघर्षच...

auto.jpg
auto.jpg

सोलापूर: अनलॉकनंतर ऑटोचालकांनी ऑटो चालविण्याचा व्यवसाय सुरू केला. पण, एसटी व रेल्वे बंद असल्याने व शहरातील वाढत्या कोरोना संसर्गाने त्यांच्या व्यवसायाला पुन्हा खीळ बसली आहे. दोन प्रवासी नेण्याच्या मर्यादेमुळे ऑटोचालकांनी 10 रुपयांऐवजी 20 रुपये भाडे आकारले आहे. मात्र, जादा भाडे प्रवासी देत नसल्याने अर्ध्याच मजुरीवर गुजराण करण्याची वेळ या व्यावसायिकांवर आली आहे. शहरातील 10 हजारांपेक्षा अधिक संख्येच्या ऑटोचालकांचे रोजीरोटीचे प्रश्‍न अजुुनही गंभीरच आहेत. 

अनलॉकमध्ये ऑटोचालकांना त्यांचा व्यवसाय करण्याची परवानगी मिळाली. मात्र, दोन प्रवासी घेण्याचे बंधन घालून देण्यात आले. पुरेसे अंतर ठेवून दोन टोकाला दोन प्रवासी बसवावेत अशी सूचना करण्यात आली. ऑटोचालकांनी व्यवसाय सुरू केला. 

मात्र, कोरोना संसर्गाने भयभीत झालेले नागरिक घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी आहे. दोन प्रवासी बसविण्याचे बंधन असल्याने 10 रुपयांच्या ऐवजी 20 रुपये भाडे आकारले तर प्रवासी भाडे वाढवून देण्यास तयार नाहीत. कमाई होण्याच्या आशेने ऑटोचालक पैशात तडजोड करून सेवा देत आहेत. सध्या एसटी सेवा बंद असल्याने प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. रेल्वे देखील अत्यंत कमी प्रमाणात सुरू आहेत. बाजारपेठ सुरू झाली असली तर त्यांच्या वेळा मर्यादित आहेत. अत्यावश्‍यक कामांशिवाय नागरिक घराबाहेर पडत नाहीत. केवळ किराणा खरेदी, दवाखाना यासाठी लोक बाहेर पडत आहेत. 
यामुळे ऑटोचालकांची रोजची कमाई 50 ते 60 रुपये कशीबशी होत आहे. पेट्रोल व गॅसचा खर्च जाता एवढीच रक्कम मिळत आहे. अनेकवेळा तर 20 ते 30 रुपयांची कमाई घेऊन घरी जावे लागत आहे. तीन महिन्यांच्या लॉकडाउनमध्ये वाहन कर्जाचा हप्ता व इतर खर्चामुळे उसनवारी व खासगी कर्ज घेऊन त्यांना घर चालवावे लागत आहे. पैशाची परतफेड करण्याइतकी कमाई देखील होत नाही. 

शासनाची कोणतीही मदत नाही 
आम्ही शासनाकडे लॉकडाउनच्या काळात मदत मागितली. पण, एक पैशाची मदत मिळाली नाही. आता व्यवसाय सुरू झाला तर प्रवासी मिळत नाहीत. त्यामुळे मोठ्या अडचणी आहेत. 
- उत्तम जानवेकर, ऑटोचालक 

कर्जाचे हफ्ते थकले आहेत 
कर्जाचे हप्ते थकले आहेत. फायनान्सवाले हप्ता भरण्यासाठी सूचना देत आहेत. काही कमाई होत नसल्याने मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. 
- शंकर पन्हाळकर, ऑटोचालक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com