सरकोली येथे दोन गटांत मारामारी; 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

Maramari
Maramari

पंढरपूर (सोलापूर) : आमच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार का दिली? या कारणावरून व मागील भांडणाचा राग मनात धरून गुरुवारी सकाळी सरकोली (ता. पंढरपूर) येथील कराळे - भोसले या दोन गटांत लोखंडी रॉड आणि काठ्यांनी मारामारी झाली. या दोन्ही गटांतील सात ते आठजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

या घटनेनंतर गावात सकाळपासून तणावपूर्ण वातावरण पसरले आहे. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे व पोलिस निरीक्षक श्री. खारतोडे यांनी सरकोली येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्परांविरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून दोन्ही गटांतील 16 जणांवर पोलिसांनी गुरुवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबतची माहिती अशी, फिर्यादी अमोल बाळासाहेब कराळे (रा. सरकोली) हे गुरुवारी सकाळी गावातील सोनई दूध संकलन केंद्रावर दूध घालण्यासाठी गेले होते. त्या वेळी तेथे असलेले संशयित आरोपी बाळासाहेब भोसले, रावसाहेब भोसले, चैतन्य भोसले, हर्षवर्धन भोसले, तुकाराम भोसले व त्यांच्या सोबतच्या इतर चार ते पाचजणांनी "तू आमच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार देतो काय' असे म्हणून शिवीगाळ करून चैतन्य भोसले याने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या उजव्या बरगडीवर मारहाण केली. त्यानंतरही फिर्यादी घरी जात असताना त्यांच्या मोटारसायकलला चारचाकी गाडी आडवी लावून गोपाळ भोसले याने पुन्हा मारहाण केली. फिर्यादीचे चुलते सोडवण्यास आले असता त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चैतन्य व हर्षवर्धन भोसले यांनी चुलते रामचंद्र यांना "थांब तुला जिवे मारतो' अशी धमकी देत अंगावर दुचाकी घातली. त्याच वेळी भांडणे सोडवण्यास आलेल्या धनाजी कराळे, बाळासाहेब कराळे यांच्या डोक्‍यात व सर्वांगावर मारून त्यांनाही जखमी केले. 

याच दरम्यान गोपाळ रावसाहेब भोसले यांनीही संशयित आरोपी धनाजी कराळे, अंकुश कराळे, लहू कराळे, अमोल कराळे, रामचंद्र कराळे, तानाजी कराळे, बाळासाहेब कराळे, दिगंबर कराळे, दत्तात्रय कराळे, विशाल कराळे यांच्यावर व इतर चार ते पाच महिलांवर मारहाण केल्याप्रकऱणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
फिर्यादीच्या चारचाकी वाहनासमोर मोटारसायकल आडवी लावून आरोपी धनाजी कराळे व अंकुश कराळे यांनी काठी व डोक्‍यात दगड मारून जखमी केले. ब्रिजा गाडीची काच फोडून नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. ओलेकर हे करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com