गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

crime.jpg
crime.jpg
Updated on

महूद(सोलापूर) : कॅनॉल जवळ अडकलेली गाडी काढण्यासाठी जेसीबी मशीन घेऊन या,असा फोन करून जेसीबी मालकाला रात्रीच्या अंधारात एकट्यास बोलावून घेतले.एकटा गेलेल्या जेसीबी मालकाला रात्रीच्या अंधारात तिघांनी मारहाण करून लुटले.ही घटना महूद (ता.सांगोला) शिवारातील ढाळेवाडी मेंढी फार्म जवळ असणाऱ्या गायरानातील कॅनॉल पट्टी जवळ घडली आहे. 

महूद अंतर्गत असलेल्या ढाळेवाडी येथील सुशांत शंकर शिंदे या तरुण जेसीबी मालकाने याबाबत सांगोला पोलिसात तक्रार नोंदवली आहे. रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान सुशांत शिंदे यांच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला. फोनवर त्या व्यक्तीने आमची गाडी कॅनॉल जवळ फसली आहे. ती बाहेर काढण्यासाठी तुमचे जेसीबी मशीन घेऊन या असे सांगितले. नंतर लगेच त्या व्यक्तीने प्रथम तुम्ही पाहण्यासाठी स्वतः या व नंतर मशीन घेऊन या असे सांगितले. 

फोन वरील व्यक्तीला नाव,गाव न विचारता त्यावर विश्वास ठेवून सुशांत शिंदे हे ढाळेवाडी मेंढी फार्म जवळ असलेल्या गायरानातील कॅनॉल पट्टी जवळ पोहोचले. त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाच्या स्कार्पियो जवळ तीन लोक होते. स्कार्पिओ ची नंबर प्लेट काढलेली होती. हे तिघे जण काळ्यासावळ्या रंगाचे व मजबूत बांध्याचे होते. तिथे पोहचल्यानंतर तिघांपैकी एकाने आमच्या मोबाईल मध्ये बॅलन्स नाही. आमचे टेम्पो गाडी पुढे फसली आहे. शेटला फोन करतो म्हणून शिंदे याचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यापैकी एकाने पाठीमागून मिठी मारून हात धरले तर दुसऱ्याने रिव्हॉल्वर सारखी वस्तू डोक्‍याला लावून शिवीगाळ व मारहाण करत जवळील पैशाची मागणी केली. खिशातील पंधरा हजार रुपये हिसकावून घेतले नंतर त्याच्या मोटरसायकलवर लाथ मारून मोटारसायकल सह त्याला कॅनॉल मध्ये पाडले. यामुळे डोक्‍याला मार लागल्याने शिंदे बेशुद्ध पडले होते. अंदाजे 30ते 40 वयोगटातील तिघा चोरट्यांनी सुशांत शिंदे यास मारहाण करून त्यांच्याकडील रोख 15 हजार रुपये व मोबाइल असे एकूण 25 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. 

संपादनः प्रकाश सनपूरकर  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com