जिम व योगानंतर आता क्रिकेट सरावाला परवानगीची प्रतिक्षा 

cricket.jpg
cricket.jpg

सोलापूरः जिम व योगाप्रमाणे आता क्रिकेटच्या सरावाला कोरोना सुरक्षा नियमांच्या अटीवर सुरूवात केली जावी यासाठी शहरातील क्रिकेट प्रेमी व पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. शरीर सशक्त व इम्युनिटी वाढीसाठी उपयुक्त असलेल्या क्रिकेटच्या सराव घरात अडकलेल्या खेळांडूना कोरोनाच्या निराशेच्या भावनेतून बाहेर काढण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. 

क्रिकेटचा सराव सुरू करण्याच्या दृष्टीने व्यापकस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. जीम व योगा केंद्राला शासनाने परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे बाजारापेठेत नागरिकांच्या खरेदीची समस्या सुटावी व अर्थकारण भक्कम व्हावे म्हणून परवानगी मिळाली. तसेच हॉटेलिंग व्यवसायाला देखील परवानगी मिळाली आहे. जीम व योगा केंद्राच्या माध्यमातून शरीर सशक्तीकरण होते म्हणून त्यास देखील परवानगी मिळाली आहे. 

मात्र नेमका खेळाच्या सरावाची परवानगी अद्याप प्रशासनाने दिली नाही. खेळ म्हणजे सामने व प्रेक्षकांची गर्दी हे गृहीत धरल्याने परवानगीची अडचण झाली आहे. प्रत्यक्षात सरावाच्या ठिकाणी गर्दी व सामने या दोन्ही बाबी नसतात. फक्त खेळांडूना सरावाच करायचा असतो. या सरावामध्ये शरीर सशक्तीकरण व इम्युनिटी वाढवणे या दोन्ही गोष्टी कोरोना विरुध्द लढण्यासाठी सहजपणे साध्य केल्या जातात. तसेच क्रिकेटच्या सरावामध्ये कोरोनाने सर्वच नियम पाळणे या खेळाच्या पध्दतीमुळे सहज शक्‍य आहे. मास्क वापरून सराव करता येणे शक्‍य आहे. सोशल डिस्टन्सचा नियम क्रिकेटच्या खेळपध्दतीमध्ये असल्याने त्यासाठी सरावात कोणताही बदल न करता हा नियम पाळला जाऊ शकतो. सॅनिटायझरचा वापर देखील खेळांडूना करणे शक्‍य आहे. मात्र सरावाने थेट शरीर सक्षमीकरण व ईम्युनिटी वाढवण्यास चालना मिळणार आहे. 
या पूर्वी ज्या क्षेत्राला दिलेल्या परवानग्या दिल्या आहेत त्यामध्ये काही क्षेत्रात कोरोना सुरक्षिततेचे नियमाचे पालन करणे अडचणीचे होते. मात्र क्रिकेट सरावामध्ये निवडक खेळांडू असल्याने सुरक्षा नियमांचे पालन करणे सहज शक्‍य होते. क्रिडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे खेळाडू, तालुका व जिल्हास्तरावर पोहोचलेले क्रिकेटपटू यांच्यासह अनेक नविन खेळाडू सराव सुरु व्हावा यासाठी तयारीत आहेत. मागील सहा महिन्यात लॉकडाउनमुळे शेकडो खेळाडूंचे स्पोर्ट करिअर अडचणीत येणार आहे. निदान सामने झाले नाही तरी नियमित सराव हा या क्रिडापटुंचा महत्वाचा आधार आहे. अनेक खेळांडू कोणत्याही पुरस्कार अथवा स्पर्धाची अपेक्षा न करता नियमित सरावाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग मानतात. दरम्यान, पुण्यात क्रिकेट सरावाला परवानगी मिळाल्याच्या माहितीने सोलापूरात देखील लवकरच परवानगी मिळेल असे मानले जात आहे. 


क्रिकेट सराव उपयुक्तच 
- शरीर सशक्तीकरण व इम्युनिटी वर्धन 
- मास्क वापरून सराव करणे शक्‍य 
- सोशल डिस्टन्स व सॅनिटायझरचा वापर 

 परवानगीसाठी प्रयत्न
नियमित क्रिकेट सरावाला परवानगी मिळावी यासाठी प्रयत्न सूरू आहेत. राज्यातील इतर शहरात अशी परवानगी मिळाल्याची माहिती आहे. प्रशासनाच्या परवानगीनंतर खेळाडुंना सराव करता येणे शक्‍य आहे 
- चंद्रकांत रेंम्बर्सू सरचिटणीस, जिल्हा क्रिकेट असोसिएशन, सोलापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com