लॉकडाऊनमध्ये असा मिळतोय कलागुणांना वाव

सुस्मिता वडतिले
Wednesday, 13 May 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्या आदेशानुसार सध्या सर्वत्र लॉकडाउन सुरु आहे. लॉकडाउनच्या महत्त्वाच्या काळात आपण सर्व घरात बसून आहात. अशावेळी आपल्यातला कल्पनाशक्तीला जागे करून आपण स्वत:मध्ये लपलेल्या विविध कलाकृतींना उजाळा देऊन त्यांची जोपासना करण्याचा कालावधी असल्यामुळे अनेकजण ऑनलाईन स्पर्धा घेत आहेत. त्यामुळे अनेकांच्या कलागुणांना वाव मिळत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाउनच्या काळात रोज नव्याने काय करायचे?  असा प्रश्न बहुतांश जणांना पडतो आहे. त्यामुळे अनेकजण पुढे येऊन ऑनलाइन स्पर्धा सुरू केले आहेत.

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्या आदेशानुसार सध्या सर्वत्र लॉकडाउन सुरु आहे. लॉकडाउनच्या महत्त्वाच्या काळात आपण सर्व घरात बसून आहात. अशावेळी आपल्यातला कल्पनाशक्तीला जागे करून आपण स्वत:मध्ये लपलेल्या विविध कलाकृतींना उजाळा देऊन त्यांची जोपासना करण्याचा कालावधी असल्यामुळे अनेकजण ऑनलाईन स्पर्धा घेत आहेत. त्यामुळे अनेकांच्या कलागुणांना वाव मिळत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाउनच्या काळात रोज नव्याने काय करायचे?  असा प्रश्न बहुतांश जणांना पडतो आहे. त्यामुळे अनेकजण पुढे येऊन ऑनलाइन स्पर्धा सुरू केले आहेत.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
संचारबंदीच्या काळात सोशल मीडियावर विविध स्पर्धांचे आयोजन सुरू असलेले दिसून येत आहे. यामुळे लहानपणापासून मोठ्यापर्यंत अनेकजण ऑनलाईन स्पर्धामध्ये सहभागी होत आहेत. लॉकडाउनच्या दिवसांत घरांमध्ये राहणा-यांचे स्वास्थ्य मनोरंजन, व्यक्तिमत्व विकास आणि जागरूकता असल्यामुळे अनेकजण पुढे येत आहेत. त्याच पद्धतीने सोशल मीडियात फेसबुक, व्हाट्सअॅप, इंस्टाग्रामवरही काही दिवसांपासून ऑनलाईन स्पर्धा सुरू झाल्या आहेत.
कोरोना व्हायरसचे संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी जनता लॉकडाउनचे पालन करत आहेत. त्यामुळे देशाच्या सुरक्षेसाठी घरातून बाहेर निघत नाही. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तयार करण्यात आलेले लक्ष्य, मोबाईल फोन आणि इंटरनेटचा वापर करून या स्पर्धा घेतल्या जात आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे माणसाच्या वाट्याला आलेली हतबलता नैराश्य आणि विस्कळीत सार्वजनिक जीवन या पाश्वभुमीवर जगभर जनता विविध मार्गांनी सभोवतालच्या परिस्थितीशी झुंजत आहेत. एकमेकांना सहाय्य करीत आहेत. अशावेळी अभिव्यक्तीला प्रोत्साहित देण्यासाठी अनेकजण ऑनलाईन स्पर्धा घेण्यास सुरू केले आहेत. आपल्या कलेला जिवंत ठेवण्यासाठी आणि आपल्यातले कलाकार जपण्यासाठी या अशा स्पर्धांचे आयोजन केलेले दिसून येत आहे. प्रत्येक कलाकारांना ऑनलाइन स्पर्धेतून वाव मिळत आहे. त्यातून नवीन कलाकारही तयार होत आहेत. त्यामुळे अनेकजण लॉक डाउनचा कालावधी नक्कीच सत्कारणी लावत आहेत असे दिसून येत आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुक, व्हाट्स अॅप, इंस्टाग्रामवरही गेल्या काही दिवसांपासून प्रत्येकाच्या अंगातील कला जिवंत ठेवण्यासाठी अनेक जण ऑनलाईन स्पर्धामध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, सिंगिंग स्पर्धा, क्युट किड्स कॉम्पिटिशन स्पर्धा, पारंपारिक वेशभूषा स्पर्धा कॉम्पिटिशन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, एकपात्री नाट्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, छायाचित्रण स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, लेखन स्पर्धा, अभिनय स्पर्धा, गायन स्पर्धा अशा स्पर्धांचा समावेश केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is a lot of art in lockdown