या आमदारांनी ग्रामीण रूग्णालयांना केले 50 लाखाचे साहित्य वितरीत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जून 2020

दोनही केंद्रांना 1 हजार 300 पीपीई किट, तीन हजार मास्क, सॅनिटायझरच्या बाटल्या, दोन हजार ट्रिपल लेयर मास्क, तीन हजार विविध आकाराचे रबर ग्लोज, दहा इन्फरेड थर्मल स्कॅनर व दोन हजार व्हीटीएम किट असे साहित्य वितरीत करण्यात आले.

सांगोला (जि. सोलापूर) : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आमदार फंडातून सांगोला ग्रामीण रुग्णालय व भाळवणी (ता. पंढरपूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास 50 लाखांचे साहित्य वितरीत केले. 

दोनही केंद्रांना 1 हजार 300 पीपीई किट, तीन हजार मास्क, सॅनिटायझरच्या बाटल्या, दोन हजार ट्रिपल लेयर मास्क, तीन हजार विविध आकाराचे रबर ग्लोज, दहा इन्फरेड थर्मल स्कॅनर व दोन हजार व्हीटीएम किट असे साहित्य वितरीत करण्यात आले.

आमदार पाटील यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करुन सांगोला मतदार संघातील आरोग्य केंद्रासाठी वरील सर्व साहित्य उपलब्ध केले. 
या साहित्याची पाहणी करून सर्व साहित्य आरोग्य केंद्रांना व उपकेंद्रांना ते वितरण केले जाईल.

वरील साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशासनाच्या वतीने आमदार पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयाची पूर्ण पाहणी केली. नव्याने बांधकाम सुरू असणाऱ्या ट्रॉमा केअर सेंटरचीही पाहणी केली.

तहसीलदार योगेश खरमाटे, गटाविकास अधिकारी संतोष राऊत, भाऊसाहेब रुपनर, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, नगरसेवक आनंदा माने, सूर्यकांत मेटकरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सीमा दोडामनी, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. साळे यांच्यासह आधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: These MLAs visited rural hospitals Distributed materials worth Rs 50 lakh