madha rotary.png
madha rotary.png

झाडालाच पुरस्कार देऊन त्यांनी केला वृक्ष जागर कार्याचा गौरव 

Published on

माढा(सोलापूर): रोटरी क्‍लब ऑफ माढाकडून देण्यात येणारा पुरस्कार पर्यावरण मित्र म्हणून माढयातील "इंस्पायर फौंडेशन इंडिया" यांना जाहीर झाल्यानंतर तो प्रातिनिधीक स्वरुपात झाडाला बहाल करण्यात आला. इंस्पायर फौंडेशन या संस्थेच्या वृक्ष लागवडीच्या कार्याचा गौरव करण्यासाठी संस्थेने लावलेल्या रोपट्यास पुरस्कार दिला गेला. 

रोटरीने 10 विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा "रोटरी पुरस्कार" देऊन सन्मान केला. मागील तीन वर्षापासून इंस्पायर फौंडेशन ही संस्था जिल्ह्यातील 48 गावामध्ये वृक्ष लागवड व जनजागरणाचे काम करते. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येत आहे. या संस्थेचा वृक्ष लागवड कार्याचा सन्मान हा केवळ झाडांच्या माध्यमातून व्हावा म्हणून हा पुरस्कार झाडाला देण्यात आला. 

यावेळी बोलताना रोटरीचे अध्यक्ष डॉ. संदिप टोंगळे म्हणाले की झाडे लावण्यात समाजातील प्रत्येक घटकांचा सहभाग तितकाच महत्वाचा आहे. आता प्रत्येकाच्या मनात झाड लावण्याची वेळ आली आहे. या सुंदर विचारांनी फुललेली इंस्पायर फौंडेशन खरंच कौतुकास पात्र आहे.इंस्पायर फौंडेशनच कार्य तर समाजाला दिशादर्शक ठरणार आहे", असे मनोगत रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर डॉ. सुहास खडके यांनी व्यक्त केले. समाज सुधारणा करायची असेल तर समाजातील अशा उत्कृष्ट व्यक्तींची ओळख समाजाला करून देऊन योग्य दिशा दाखवण्याचं काम व्हायला हवं, असं काम रोटरी करत असल्याबद्दल सहायक पोलीस निरीक्षक अमुल कादबाने यांनी रोटरीचे कौतुक केले. 
या कार्यक्रमात पुरस्कर्त्यांना सन्मानपत्र, रोटरी नॅपकिन बुके, कागदी फुले देऊन गौरविण्यात आले. याच कार्यक्रमांतर्गत रोटरी अध्यक्ष डॉ. संदीप टोंगळे आणि सचिव प्रशांत उबाळे यांचा निरोप समारंभ तर नूतन अध्यक्ष प्रा. अशोक लोंढे व सचिव किरण चव्हाण यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. रोटरीकडून दरवर्षी दिला जाणारा बेस्ट रोटेरियन पुरस्कार भारत लटके, रोटरी आयकॉन पुरस्कार डॉ. सुभाष पाटील तर रोटरी क्विझ पुरस्कार मृणाल भांगे यांना देण्यात आला. कार्यक्रमास डॉ. सोमेश्वर टोंगळे, डॉ. सुभाष पाटील, नागनाथ घाडगे, दिनेश जगदाळे, भारत लटके, सचिन घाडगे, गोपीनाथ गवळी, संभाजी चव्हाण, डॉ. सचिन गोडगे, निलेश लटके यांनी परीश्रम घेतले. 


पुरस्कार प्राप्त मान्यवर 
अरुणा देशपांडे ( शैक्षणिक ), सपना तानाजी माळी ( क्रीडा ), डॉ धनंजय जगदाळे ( वैद्यकीय ), मोहन पाटील ( संगीत कला ), हनुमंत बारबोले (सामाजिक ), इंस्पायर फौंडेशन( पर्यावरण मित्र ), गीता घाडगे (नारीशक्ती ), मदन चवरे (पत्रकारिता ), गंगाराम शिंगाडे ( कृषी ), गणपत क्षीरसागर (उद्योजक ). 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com