
सोलापूर : नुकतेच निधन झालेल्या इरफान खान या अभिनेत्याने "द लंच बॉक्स'या सारख्या साध्या विषयावरील चित्रपटात उत्तम अभिनय करून यासारख्या विषयावरही चित्रपट होऊ शकते हे दाखवून दिले. परंतु, सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाउन आहे. त्यामुळे आज कित्येक उद्योगधंदे, कंपन्या बंद असल्याने या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि परप्रांतीयांची खाण्याची भ्रांत होत आहे. परंतु, सोलापुरातील "उद्योगवर्धिनी'च्या कम्युनिटी किचनने त्यांची भूक भागवून त्यांच्यासाठी हे जणू कम्युनिटी किचन "लंच बॉक्स' बनले.
हेही वाचा : हे असल्याशिवाय सलून दुकान सुरू करणे अशक्य
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने एसटी, रेल्वे, विमानसेवा अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद केली आहे. तसेच, देशभरात लॉकडाउन असल्याने शहरातील हॉटेल, ढाबे, चहाच्या टपऱ्या, विविध खाद्यपदार्थांच्या गाड्याही बंद आहेत. त्यामुळे जे नागरिक परगावहून पोटाची खळगी भरण्यासाठी व कामानिमित्त देशातील विविध कानाकोपऱ्यात वास्तव्यास होते त्यांच्या खाण्यापिण्याची मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण झाली. यासाठी या नागरिकांनी आपल्या घरी पायी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र सोलापुरात आल्यावर त्यांना पोलिसांकडून थांबविण्यात आले. त्यांच्यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.मात्र, त्यांना दोन वेळेसचे जेवण देण्यासाठी सोलापुरातील दत्त चौक येथील "उद्योगवर्धिनी' येथून जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
हेही वाचा : संकटात देखील तीच्या मदतीचा हात अन सेवेची धडपड
23 मार्च रोजी या कम्युनिटी किचनची निर्मिती करण्यात आली. आजपर्यंत जवळपास पाच हजारांपेक्षा जास्त जणांना दोन वेळेसचे जेवण पोचविण्यात आले. तसेच, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रस्त्यावर उतरून अहोरात्र मेहनत घेत आहेत त्यांनाही या कम्युनिटी किचनमधून दोन वेळेसचे जेवण पाठविण्यात आले.या कम्युनिटी किचनमधून आजपर्यंत सोलापुरातील रोटरी मेन क्लब, गुजराती समाज, हायर कंपनी, बॅंक ऑफ बडोदा, भावसार व्हिजन या सामाजिक संस्था, बॅंकेसह सोलापुरातील उद्योगपतींनी उद्योगवर्धिनीच्या कम्युनिटी किचनमधून जेवण तयार करून घेतले. हे भोजन परप्रांतातून आलेल्या नागरिकांना, रस्त्यावरील बेघर नागरिकांना, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सोलापूर जिल्हासह अन्य राज्यांतून रुग्ण येतात अशा रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना देण्यात आले.
विविध सामाजिक संस्थांना बनवून दिले जेवण
उद्योगवर्धिनीने जवळपास 10 ते 12 सामाजिक संस्थांना जेवण बनवून देण्याचे काम केले आहे. या कम्युनिटी किचनमध्ये जेवण तयार करण्यासाठी एकूण 22 जण काम करत आहेत. मात्र, सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सध्या सात जणांवर काम सुरू आहे. जेवणात पोळी, भाजी, कडधान्यांची उसळ आदी पदार्थ देण्यात येतात.
- चंद्रिका चौहान,
प्रमुख, उद्योगवर्धिनी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.