सोलापुरातील तिघांचा कोरोनामुळे आज मृत्यू, 103 रूग्ण वाढल्याने एकूण संख्या 851 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

कोरोना चाचणीचे अद्यापही 499 अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. कोरोना मुक्त झालेल्या 30 जणांना आज घरी सोडण्यात आले असून सोलापुरातील 351 व्यक्ती आतापर्यंत कोरोना मुक्त झाल्या आहेत.

सोलापूर :  सोलापूर शहरातील तीन व्यक्तींचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला असून सोलापुरातील एकूण 75 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात तब्बल 103 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने सोलापुरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 851 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 
पश्चिम मंगळवार पेठ परिसरातील 74 वर्षीय महिलेला 28 मे रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान या महिलेचे 28 मे रोजी निधन झाले. इंदिरानगर परिसरातील बेघर हाऊसिंग सोसायटीमधील 93 वर्षीय पुरुषाला 27 मे रोजी दुपारी अडीचच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले. 29 मे रोजी पहाटे सव्वाचार वाजता त्यांचे निधन झाले. लष्कर परिसरातील सत्यनाम चौकातील 67 वर्षीय महिलेला 23 मे रोजी दुपारी चारच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले उपचारादरम्यान 29 मे रोजी दुपारी एक वाजता या महिलेचे निधन झाले.

आज नव्याने आढळलेल्या 103 रुग्णांमध्ये न्यू पाछा पेठेतील एक पुरुष, आदर्श नगर जुना कुंभारी नाका येथील एक पुरुष व एक महिला, जुना विडी घरकुल येथील दोन पुरुष, विडी घरकुल येथील एक पुरुष, शाहीर वस्ती भवानी पेठेतील एक पुरुष, गोदुताई विडी घरकुल ग्रुप अ येथील एक महिला, भवानी पेठेतील एक पुरुष व एक महिला, निराळे वस्तीते महादेव गल्लीतील  एक महिला, तेलंगी पाछा पेठ येथील एक महिला,  नइ जिंदगी शोभादेवी नगर येथील एक पुरुष, रेल्वे लाइन्स येथील एक पुरुष, वेणुगोपाल नगर कुमठा नाका येथील एक पुरुष, विजापूर नाका झोपडपट्टी नंबर एक येथील एक महिला, नइ  जिंदगी येथील सहा पुरुष, नइ जिंदगी येथील चंद्रकला नगर मधील एक पुरुष, शांती नगर (शशिकला नगर जवळ) येथील एक महिला, सम्राट हाउसिंग सोसायटी येथील एक पुरुष, भवानी पेठेतील ढोर गल्ली येथील एक पुरुष, फॉरेस्ट लाईन परिसरातील कुमार चौकातील एक महिला, पश्चिम मंगळवार पेठेतील एक महिल,  बेघर हौसिंग सोसायटी येथील एक पुरुष, अद्वैत अपार्टमेंट येथील एक पुरुष,  उत्तर सदर बझार गल्ली लष्कर येथील एक पुरुष,  शास्त्री नगर येथील एक महिला, दत्तनगर येथील एक महिला, रविवार पेठेतील दोन पुरुष, मार्कंडेय नगर कुमठा नाका येथील एक पुरुष जेल रोड परिसरातील 34 पुरुष, मजरेवाडी येथील एक महिला, बादशा पेठेतील पाच पुरुष व  तीन महिला, न्यू बुधवार पेठेतील पाच पुरुष,  मसीहा नगर येथील एक पुरुष, कस्तुरबा गांधी नगर येथील दोन पुरुष, उत्तर सोलापूर तालुक्यातील केगाव येथील एक पुरुष, न्यू पाछा  पेठेतील एक पुरुष, अशोक चौकातील एक पुरुष व एक महिला, पाछा पेठेतील एक पुरुष व  दोन महिला,  उत्तर कसब्यातील एक पुरुष, शिंदे चौकातील एक पुरुष, अवंती नगर जुना पुना नाका येथील एक महिला, जोडभावी पेठ येथील एक महिला, सिद्धेश्वर पेठेतील एक महिला, मंगळवार पेठेतील बुधले गल्ली येथील एक पुरुष, बार्शी तालुक्यातील जामगाव येथील तीन महिला असे नवीन कोरोना बाधित रुग्ण आज  आढळले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three died of corona in Solapur today, bringing the total number to 851 with 103 patients