ब्रेकिंग! 'आरटीओ'चे तीन अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह; 18 कर्मचारी क्‍वारंटाईन 

तात्या लांडगे
Tuesday, 29 September 2020

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. डोळे म्हणाले... 

 • उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील तीन अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह 
 • संपर्कातील 18 कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेतले; रिपोर्ट उद्या (बुधवारी) येईल 
 • अधिकारी पॉझिटिव्ह आढळल्याने कर्मचारीही बाधित असण्याची शक्‍यता 
 • वाहनचालक तथा वाहनधारकांनी अत्यावश्‍यक काम असेल तरच कार्यालयात यावे 
 • आगामी 14 दिवसांपर्यंत कामाचे प्रमाण अन्‌ कामकाजाची वेळ कमी होईल  
 • मोठ्या वाहनांचे पासिंग बंद राहणार
 • शिकाऊ वाहन परवाना देण्याचे काम, दुचाकी व चारचाकी नवीन वाहनांची नोंदणी कमी प्रमाणात होईल

सोलापूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील तीन अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांची कोविड- 19 ची टेस्ट मंगळवारी (ता. 29) पार पडली. अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील 18 कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

वाहन परवान्यासह अन्य कामांसाठी आरटीओ कार्यालयात मोठी गर्दी होऊ लागली आहे. त्याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. बहूतांश व्यक्‍ती विनामास्क फिरत असतात. त्यामुळे कोरोनाची भिती वाटू लागली आहे. दरम्यान, कार्यालयातील तीन अधिकारी कोरोना बाधित झाले आहेत. कामानिमित्त त्यांच्या संपर्कात येणाऱ्या 15 कर्मचाऱ्यांचेही रिपोर्ट घेण्यात आले असून त्यांचा अहवाल प्रलंबित आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी आरटीओ कार्यालयात गर्दी करु नये, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी केले आहे. दरम्यान, कामाचे प्रमाण कमी केले जाणार असून कामकाजाच्या वेळेतही बदल होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. डोळे म्हणाले... 

 • उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील तीन अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह 
 • संपर्कातील 18 कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेतले; रिपोर्ट उद्या (बुधवारी) येईल 
 • अधिकारी पॉझिटिव्ह आढळल्याने कर्मचारीही बाधित असण्याची शक्‍यता 
 • वाहनचालक तथा वाहनधारकांनी अत्यावश्‍यक काम असेल तरच कार्यालयात यावे 
 • आगामी 14 दिवसांपर्यंत कामाचे प्रमाण अन्‌ कामकाजाची वेळ कमी होईल  
 • मोठ्या वाहनांचे पासिंग बंद राहणार
 • शिकाऊ वाहन परवाना देण्याचे काम, दुचाकी व चारचाकी नवीन वाहनांची नोंदणी कमी प्रमाणात होईल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three solapur RTO officers corona positive; 15 staff quarantine