ब्रेकिंग ! मोहोळ येथे भीषण अपघात; कंटेनर व टँकर जळून खाक

चंद्रकांत देवकते
Sunday, 22 November 2020

कुरुल रस्त्यावर शंकर मुसळे यांच्या हॉटेल वैष्णवी जवळ केमिकल टँकरची व मालवाहतूक करणाऱ्या मोठ्या गाडीची समोरासमोर सकाळी साडेदहाच्या सुमारास जोराची भीषण धडक झाली.

मोहोळ (सोलापूर) : येथे कुरुल रस्त्यावर शंकर मुसळे यांच्या हॉटेल वैष्णवी जवळ केमिकल टँकरची व मालवाहतूक करणाऱ्या मोठ्या गाडीची समोरासमोर सकाळी साडेदहाच्या सुमारास जोराची भीषण धडक झाली. या झालेल्या अपघातामध्ये दोन्ही गाड्यांना आग लागली असून दोन्ही गाड्या जळून खाक होत आहेत. सुदैवाने यामध्ये काहीही जीवित हानी झाली नाही.

पोलिस निरीक्षक अशोक सायकर, पोलिस कर्मचारी निलेश देशमुख व पोलिस कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न केला. लोकनेते साखर कारखाना अनगरचे अग्निशामक दल घटनास्थळी पोहचले असून आसपासच्या परिसरास आगीची इजा पोहचू नये, यासाठी घटनास्थळी उभे आहे .केमिकल टॅकरमधील चालकाला शरद गाढवे, महादेव गाढवे, रूषीकेश माने, शंकर मुसळे यांनी कुराडीने दरवाजा तोडून चालकाला बाहेर काढत चालकाचा जीव वाचविला.

सुमारे तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली असून विजयपुर महामार्गाच्या गाड्याच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A tragic accident has taken place at Mohol and containers and tankers have been burnt to ashes