कोरोनाची धास्ती ! 'नीट'च्या परीक्षेला बाराशे विद्यार्थ्यांची दांडी

तात्या लांडगे
Sunday, 13 September 2020

'या' परीक्षा केंद्रांवर पार पडली परीक्षा
सिहंगड कॉलेज, सिहंगड पब्लीक स्कूल, व्हीव्हीपी पॉलिटेक्‍निक महाविद्यालय, सोनी कॉलेज, सिध्देश्‍वर वूमन्स कॉलेज, ए.जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, केएलई स्कूल, संगमेश्‍वर कॉलेज, बीएमआयटी कॉलेज, अण्णप्पा काडादी प्रशाला, ऑर्चिड स्कूल, डब्ल्यूआयटी, सुयश गुरूकुल, ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय, आयएमएस स्कूल, दमाणी हायस्कूल, अक्‍कलकोट, पंढरपूर येथील 23 परीक्षा केंद्रांवर परीक्षा झाली.

सोलापूर : नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (नीट) वतीने वैद्यकीय प्रवेशाची परीक्षा पार पडली. शहर- जिल्ह्यातील आठ हजार 231 विद्यार्थ्यांसाठी 23 परीक्षा केंद्रे होती. सोलापुरातील सात हजार 41 विद्यार्थ्यांनी या केंद्रांवर परीक्षा दिली, अशी माहिती परीक्षा समन्वयक प्रा. एस. डी. शिरगावे यांनी दिली.

कोरोनामुळे यंदा परीक्षेसाठी तीन महिन्यांचा विलंब झाला आहे. कोरोनाच्या संसर्ग काळात ही परीक्षा होत असून संबंधित एजन्सीने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. ही परीक्षा दुपारी 2 ते 5 या वेळेत पार पडली. परीक्षा केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी दोन तास अगोदर बोलावण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर जाताना हॉडग्लोज, मास्कचा वापर केल्याचे पहायला मिळाले. तसेच परीक्षा केंद्रात जात असताना विद्यार्थ्यांवर पोलिस कर्मचाऱ्यांकडून परीक्षार्थींची थर्मल स्क्रिनिंग केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत विचारणाही करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करीत सोशल डिस्टन्स ठेवून परीक्षा दिली. मात्र, शहर- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याची धास्ती घेत एक हजार 190 विद्यार्थी गैरहजर राहिल्याचेही दिसून आले. दरम्यान, काही विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य तथा काही विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचीही परीक्षा केंद्रांवर चर्चा होती.

'या' परीक्षा केंद्रांवर पार पडली परीक्षा
सिहंगड कॉलेज, सिहंगड पब्लीक स्कूल, व्हीव्हीपी पॉलिटेक्‍निक महाविद्यालय, सोनी कॉलेज, सिध्देश्‍वर वूमन्स कॉलेज, ए.जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, केएलई स्कूल, संगमेश्‍वर कॉलेज, बीएमआयटी कॉलेज, अण्णप्पा काडादी प्रशाला, ऑर्चिड स्कूल, डब्ल्यूआयटी, सुयश गुरूकुल, ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालय, आयएमएस स्कूल, दमाणी हायस्कूल, अक्‍कलकोट, पंढरपूर येथील 23 परीक्षा केंद्रांवर परीक्षा झाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twelve hundred students sat for the NEET exam