कोरोनाविरुद्धच्या लढ्यात दोन तासांत 21 क्विंटल धान्य जमा 

Grain
Grain
Updated on

भोसे (सोलापूर) : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व कृषी विभागाने केलेल्या आवाहनास भरभरून प्रतिसाद देत भोसे (ता. मंगळवेढा) येथील बळिराजाने सध्याच्या अडचणीच्या परिस्थितीत गरिबाच्या पोटाला दोन घास मिळावेत म्हणून तब्बल 21 क्विंटल ज्वारी, बाजरी, गहू हे धान्य जमा करून नंदेश्‍वरचे मंडल कृषी अधिकारी एस. पी. पुजारी यांच्याकडे सुपूर्द केले. 

धान्यदान योजनेअंतर्गत मदत
सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने राज्यातील काही कुटुंबे जिथल्या तिथेच क्वारंटाइन केली जात आहेत. त्यामुळे राज्यभर अनेक नागरिक अडकले आहेत. अशा भीषण परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था व्हावी, यासाठी शासकीय पातळीवरून विविध उपक्रम राबवले जात आहेत. यासाठी शासनाने राबवलेल्या धान्यदान योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्‍यातील ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मदत करत आहेत. याचाच एक भाग म्हणजे भोसे येथील शेतकऱ्यांनी केलेली मदत होय. भोसे येथील बळिराजाने एकत्र येत तब्बल 21 क्विंटल ज्वारी, गहू व बाजरी येथील बसस्थानक चौकात अवघ्या दोन तासांत जमा केले. मंडल कृषी अधिकारी एस. पी. पुजारी, कृषी सहायक राजकुमार ढेपे, महादेव फराटे आदींनी गावातील शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत आवाहन केल्यानंतर लगेचच सर्व शेतकरी बांधवांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला व धान्य जमा केले. भोसे परिसरातील रड्डे, चिक्कलगी आधी गावातील शेतकऱ्यांनी देखील या उपक्रमास भरभरून प्रतिसाद देत 10 क्विंटल धान्य जमा करून मंडल कृषी अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. 

माणुसकीचा झरा जिवंत 
भोसे येथील टमटम चालक सोमनाथ खडतरे या युवकाने आपलाही या योजनेत खारीचा वाटा म्हणून भोसे परिसरातील सर्व वाड्या वस्तीवर विनामूल्य वाहन फिरवून धान्य गोळा करण्यास मदत केली. तर भोसे येथील तानाजी पवार, लिंबाजी महाडिक या हमाल बांधवांनी देखील विनामूल्य सर्व धान्य वाहनात भरून दिले. यानिमित्ताने या सर्वांनी आजही ग्रामीण भागात माणुसकीचा झरा जिवंत आहे, हे दाखवून दिले. 

मी नंदेश्‍वर मंडलात नव्याने मंडलाधिकारी म्हणून रुजू झालो आहे. दुष्काळी भाग असताना देखील अडचणीच्या काळात आवाहन केल्यानंतर अगदी दोन तासांत भोसे येथील शेतकऱ्यांनी केलेली मदत खरोखरच कौतुकास्पद आहे. 
- एस. पी. पुजारी, 
मंडल कृषी अधिकारी, नंदेश्‍वर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com