
सोलापूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग अद्यापही संपला नसून आज 984 जणांच्या अहवालात 54 जणांचे रिपोर्ट पाझिटिव्ह आले आहेत. जुळे सोलापूर, कुमठा, विजयपूर रोड, रेल्वे लाईन या परिसरात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. आज विजयपूर रोडवरील नम्रता सोसायटीतील 52 वर्षीय पुरुष, तर भवानी पेठेतील 44 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सोलापुरातील मध्यवर्ती कारागृहात दोन दिवसांपूर्वी दाखल झालेल्या दोन कैदी पॉझिटिव्ह आले असून त्यांना विलगीकरण कक्षात हलविण्यात आले आहे.
ठळक बाबी...
यशवंत हौसिंग सोसायटी (कुमठा नाका), श्रध्दा एम्पायर (रेल्वे लाईन), न्यू पाच्छा पेठ, भारती विद्यापीठजवळ (जुळे सोलापूर), बसवेश्वर नगर, अंत्रोळीकर नगर (होटगी रोड), उमा नगरी, आकाशवाणी केंद्राजवळ (एमआयडीसी), रंचना सोसायटी (आसरा), शरयू श्रीकांत नगर, साखर पेठ, सैफूल, वैष्णवी नगर, हत्तुरे वस्ती, आदित्य नगर, सोरेगाव, जवान नगर, सैनिक सोसायटी (विजयपूर रोड), कविता नगर पोलिस लाईन, संजय नगर (विजापूर नाका), तुकाराम अपार्टमेंट (चांदणी चौक), रेल्वे लाईन, हिरेहब्बू कॉम्प्लेक्सजवळ (बाळीवेस), मुमताज नगर (कुमठा नाका), बनशंकरी नगर, शुक्रवार पेठ, आसरा सोसायटी (सुरवसे शाळेजवळ), रामवाडी, लक्ष्मी नगर (बाळे), अक्षय सोसायटी, व्हीएमजीएससी महिला हॉस्टेल, जोडभावी पेठ, सोनी सिटी (दमाणी नगर), जुनी मिल चाळ, हरिपदम रेसिडेन्सी (सम्राट चौक), सोलापूर जेल, भूषण नगर, रेल्वे क्वॉर्टर, भवानी पेठ, चित्तूरचनम्मा नगर (सैफूल), दाजी पेठ, नटराज सोसायटी, धर्मराज नगर (शेळगी) येथे आज नव्या रुग्णांची भर पडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.