esakal | जालना जिल्ह्यातील ऊसतोडणी मजूर जोडप्याचा माढा तालुक्‍यात अपघातात मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

Two killed in accident in Madha taluka

कंटेनरने मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलवरील ऊस तोडणी करणाऱ्या मजूर जोडप्याचा मृत्यू झाला. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीमानगर येथील सरदारजी ढाब्यासमोर रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये रामदास दत्तू गायकवाड (वय 38) व त्याची पत्नी मीरा रामदास गायकवाड (वय 35, रा. दोघेही कैकाडी मोहल्ला जालना, जि. जालना) या ऊस तोडणी कामगार मजूर जोडप्याचा मृत्यू झाला. 

जालना जिल्ह्यातील ऊसतोडणी मजूर जोडप्याचा माढा तालुक्‍यात अपघातात मृत्यू 

sakal_logo
By
संतोष पाटील

टेंभुर्णी (सोलापूर) : कंटेनरने मोटारसायकलला मागून जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलवरील ऊस तोडणी करणाऱ्या मजूर जोडप्याचा मृत्यू झाला. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीमानगर येथील सरदारजी ढाब्यासमोर रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामध्ये रामदास दत्तू गायकवाड (वय 38) व त्याची पत्नी मीरा रामदास गायकवाड (वय 35, रा. दोघेही कैकाडी मोहल्ला जालना, जि. जालना) या ऊस तोडणी कामगार मजूर जोडप्याचा मृत्यू झाला. 

रामदास गायकवाड व त्याची पत्नी मीरा हे जालना येथून इंदापूर तालुक्‍यातील गणेशवाडी येथे ऊस तोडणी कामासाठी आले होते. ऊस तोडणीचे काम करून ट्रॅक्‍टर भरून देऊन ते दोघे रविवारी रात्री उशिरा मोटारसायकलवरून (एमएच 20/बीडब्ल्यू 4083) गणेशवाडी येथे मुक्कामासाठी खोप्यावर निघाले होते. भीमानगरनजिक सरदारजी ढाब्यासमोर त्यांची मोटारसायकल आली असता मागून येणाऱ्या कंटेनरने (एमएच12/एलटी 6841) मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात रामदास गायकवाड हा जागीच ठार झाला तर त्याची पत्नी मीरा ही इंदापूर येथे उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी मयत झाली. 

अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे, अपघात पथकाचे सहाय्यक पोलिस फौजदार अभिमान गुटाळ व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी आले. अपघातातील जखमी महिलेस उपचारासाठी इंदापूरला पाठविले पण उपचार सुरू असताना जखमी मीरा गायकवाड यांचा मृत्यू झाला. टेंभुर्णी पोलिस ठाण्यात सुरेश मधुकर भोसले (वय 30, रा. डोंगरगांव, ता. बदनापूर, जि. जालना) यांनी फिर्याद दिली आहे. 

संपादन : वैभव गाढवे