बार्शीत वैद्यकिय अधिकाऱ्यांचे दोन कुटूंबीय कोरोना पॉझिटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जून 2020

शुक्रवारी सकाळी एकूण 17 चाचणी अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये बार्शी शहरातील 15,पांगरी 1,खांडवी 1 असे 17 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. त्या पैकी दोन जणांचे पॉझिटिव्ह आले

बार्शी(सोलापूर) ः रुग्णांच्या भागातील व संपर्कातील घेतलेल्या स्वॅबमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कुटुंबातील दोघे कोरोनाबाधित झाले आहेत. त्यांचा रिपोर्ट शुक्रवारी(ता.19) सकाळी पॉझिटिव्ह आला आहे. अजुन 23 जणांचे अहवाल प्रलंबित असून बार्शी तालुक्‍यातील एकूण रुग्णांची संख्या 26 झाली आहे अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष जोगदंड यांनी दिली. 

हेही वाचाः ग्रहणात काय करावे, काय नाहीः वाचा सविस्तर 

शुक्रवारी सकाळी एकूण 17 चाचणी अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये बार्शी शहरातील 15,पांगरी 1,खांडवी 1 असे 17 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. त्या पैकी दोन जणांचे पॉझिटिव्ह आले तर शहरातील 13,पांगरी 1 व खांडवी 1 असे 15 जणांचे निगेटिव्ह आले आहेत. शुक्रवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या दोन कोरोना बाधित रुग्णांना होम क्वारंटाइन करुन त्यांचेवर उपचार सुरु आहेत. शहरातील 11, वैराग 10, पांगरी 1, कुसळंब 1 असे 23 जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. बार्शीत पाच कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी तिघांवर कोविड सेंटर येथे तर एकावर पूणे येथे उपचार सुरू आहेत. अन्य एक बाधितावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे डॉ.जोगदंड यांनी स्पष्ट केले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two relatives of medical officers corona positive in barshi