ग्रहणात काय करावे काय नाही : वाचा सविस्तर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जून 2020

पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्‍चरण ग्रहणात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. 
* ग्रहणकालामध्ये (पर्वकालामध्ये) अशौच असता ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापुरती शुद्धी असते. 

सोलापूर : या वर्षीचे कंकणाकृती सूर्यग्रहण रविवारी (ता. 21) दुपारी 12च्या सुमारास उत्तरेकडील प्रदेशात दिसणार असून, उर्वरित संपूर्ण भारतात हे सूर्यग्रहण खंडग्रास दिसणार आहे. शनिवारी (ता. 20) रात्री 10 वाजता ग्रहण स्पर्शापासून ते रविवारी (ता. 21) ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली. 

ग्रहणाचा स्पर्श रविवारी 
ग्रहणाचा स्पर्श रविवारी सकाळी 10.01 वाजता, मध्य 11.38 वाजता, मोक्ष दुपारी 1.28 वाजता तर पर्व दुपारी 3.27 वाजता आहे. या सर्व वेळा मुंबईच्या आहेत, महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील प्रमुख गावांच्या स्पर्श, मध्य, मोक्ष वेळा पंचांगात पाहाव्यात, असे आवाहनही श्री. दाते यांनी केले आहे. 

हेही वाचा - ऑनलाइन शाळा अन्‌ डोळ्यांची काळजी 

ग्रहणाचे वेध 
* शनिवारी (ता. 20) रात्री 10 पासून रविवारी (ता. 21) ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत (बाल, वृद्ध, आजारी, अशक्त व्यक्ती व गर्भवतींनी) 
* रविवारी पहाटे 4.45 पासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत. 
* वेधामध्ये भोजन करू नये. स्नान, जप, नित्यकर्म, देवपूजा, श्राद्ध ही कर्मे करता येतात. 

हेही वाचा - खुषखबर ! म्हाडाच्या साडेपाच हजार घरांना नाही निधीचा अडथळा पण...

ग्रहणातील कृत्ये 
* ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे. पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्‍चरण ग्रहणात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. 
* ग्रहणकालामध्ये (पर्वकालामध्ये) अशौच असता ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापुरती शुद्धी असते. 

ग्रहणाचे राशिपरत्वे फल 
* सिंह, कन्या, मकर या राशींना शुभफल. वृषभ, तुला, धनु, कुंभ या राशींना मिश्रफल. मिथुन, कर्क, वृश्‍चिक, मीन या राशींना अनिष्टफल आहे. ज्यांना अनिष्टफल आहे त्यांनी व गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाहू नये. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What not to do in the eclipse