एसटी बुलेटच्या धडकेत दोन तरुण ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

सांगली आगाराची सांगली- शेगाव गाडी कुर्डवाडीकडे जात होती. दरम्यान पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून शेटफळ चौकाकडे निघालेल्या बुलेट मोटरसायकलला एसटीची धडक बसली,

मोहोळ (सोलापूर) : पंढरपुर- कुर्डुवाडी रस्त्यावर शेटफळ हद्दीत वागज वस्तीजवळ एसटी बस व बुलेट मोटार सायकलचा अपघात झाला. यामध्ये बुलेटवरील दोघांचाही जागीच मृत्यु झाला आहे. रविवारी (ता. ९) रात्री ११.३० वाजताच्या सुमारास शेटफळ हद्दीत ही घटना घडली.
याबाबत पोलिसांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार सांगली आगाराची सांगली- शेगाव गाडी कुर्डवाडीकडे जात होती. दरम्यान पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून शेटफळ चौकाकडे निघालेल्या बुलेट मोटरसायकलला एसटीची धडक बसली, या बुलेटवरील धनाजी बबन लवटे (वय २७, रा. कौठाळी, ता. पंढरपूर) व महादेव रमेश शिंदे (वय १६, रा. पंढरपूर) हे दोघे जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच अपघात पथकाचे पोलिस हेडकॉन्स्टेबल अविनाश शिंदे व हायवे पेट्रोलिंगचे नाना उघडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन दोन्ही मृतदेह तातडीने ग्रामीण रुग्णालयात आणण्यास मदत केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two youths killed in ST bike accident