ब्रेकिंग ! विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेची सक्‍ती 

तात्या लांडगे
Tuesday, 8 September 2020

विश्‍वासर्हता पडताळणीनंतरच मिळणार गुण 
अंतिम वर्षाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे गुणदानही वेगळ्या पध्दतीने केले जाणार आहे. घरी बसून विद्यार्थी परीक्षा देणार असल्याने बहुतांश विद्यार्थी प्रश्‍नांची उत्तरे पुस्तकात पाहून सोडविण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मागील सत्रातील गुण आणि अंतिम सत्रात पडलेले गुण याची सरासरी काढली जाणार आहे. तत्पूर्वी, त्याने सोडविलेल्या उत्तरांची विश्‍वासर्हता पडताळली जाणार आहे. त्यानुसार त्याला गुण दिले जातील, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. अंतिम वर्षातील किती विद्यार्थ्यांचा ऑनलाइन परीक्षेस नकार आहे, त्याची कारणे काय आहेत, याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दोन दिवसांत मागितली आहेत. त्यानुसार विद्यापीठांनी विद्यार्थ्यांकडून अर्ज भरुन घेण्याची तयारी केली आहे.  

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत 42 हजार विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहेत. त्यापैकी 43 टक्‍के मुलांकडे ऑनलाइनची साधने नाहीत. तरीही, त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडून साधने उपलब्ध करावीत, असा अजब सल्ला विद्यार्थ्यांना दिला आहे. दुसरीकडे ऑनलाइन परीक्षा न देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याची लेखी कारणे एका अर्जाद्वारे विद्यापीठाला द्यावी लागणार आहेत. त्यानुसार विद्यापीठाने एक स्वतंत्र अर्ज तयार केला असून दोन दिवसांत तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविला जाणार आहे.

कोरोनामुळे यंदा अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा 5 ते 29 ऑक्‍टोबर या काळात घरबसल्या घेतल्या जाणार आहेत. त्यादृष्टीने विद्यापीठांकडून युध्दपातळीवर तयारी सुरु केली आहे. राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या निर्देशानुसार ही परीक्षा महाविद्यालय तथा विद्यापीठात होणार नाही. विद्यार्थ्यांना घरी बसूनच उत्तरपत्रिका सोडवण्याची संधी दिली जाणार आहे. तत्पूर्वी, सोलापूरसह राज्यातील 13 अकृषिक विद्यापीठांनी ऑनलाइन व ऑफलाइन असे दोन पर्याय निवडले आहेत. लॉकडाउन काळात बहुतांश विद्यार्थी त्यांच्या मूळगावी असल्याने तिथपर्यंत विद्यापीठ प्रशासनाला पोहचणे अशक्‍य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेची सक्‍ती केली जात आहे. त्यादृष्टीने विद्यापीठाने एक स्वतंत्र अर्ज तयार केला असून त्यांच्या नातेवाईकांकडे ऍन्ड्राईड मोबाइल तथा संगणक नाही का, ऑनलाइन परीक्षा का देऊ शकत नाही, अशा प्रश्‍नांची उत्तरे लिहून मागितले आहेत. परीक्षेपासून वंचित राहिल्यास वर्षभर वाट पाहावी लागेल, अशी भिती विद्यार्थ्यांना दाखविली जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

विश्‍वासर्हता पडताळणीनंतरच मिळणार गुण 
अंतिम वर्षाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे गुणदानही वेगळ्या पध्दतीने केले जाणार आहे. घरी बसून विद्यार्थी परीक्षा देणार असल्याने बहुतांश विद्यार्थी प्रश्‍नांची उत्तरे पुस्तकात पाहून सोडविण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मागील सत्रातील गुण आणि अंतिम सत्रात पडलेले गुण याची सरासरी काढली जाणार आहे. तत्पूर्वी, त्याने सोडविलेल्या उत्तरांची विश्‍वासर्हता पडताळली जाणार आहे. त्यानुसार त्याला गुण दिले जातील, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. अंतिम वर्षातील किती विद्यार्थ्यांचा ऑनलाइन परीक्षेस नकार आहे, त्याची कारणे काय आहेत, याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दोन दिवसांत मागितली आहेत. त्यानुसार विद्यापीठांनी विद्यार्थ्यांकडून अर्ज भरुन घेण्याची तयारी केली आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: University Forced requires students to take online exams