esakal | वैष्णव म्हणतोय मी लंडनमध्ये बिनधास्त आहे

बोलून बातमी शोधा

वैष्णव म्हणतोय मी लंडनमध्ये बिनधास्त आहे

सरकारी पातळीवर मदतीची अपेक्षा 
सध्या तो स्वतंत्र खोलीमध्ये राहतो. त्याचे क्‍लास ऑनलाइन सुरु आहेत. परीक्षाही ऑनलाइन घेण्याचा कॉलेजचा विचार असल्याचे वैष्णवने आम्हाला सांगितले आहे. त्याचे भारतात येणे सरकारी मदतीवर अवलंबून आहे. सरकारने खास विमान पाठविले तर तेथील विद्यार्थ्यांना भारतात येणे शक्‍य होणार आहे. पण, सध्या तो लंडनमध्ये सुखरुप आहे. 
सुनील गुंड, वैष्णवचे वडील. 

वैष्णव म्हणतोय मी लंडनमध्ये बिनधास्त आहे
sakal_logo
By
संतोष सिरसट

सोलापूर ः मला जर भारतात यायचे म्हटले तर सध्या कोणत्याही प्रकारची विमानसेवा सुरु नाही. जर ती वाहतूक सुरु झाली तरी भारतात येऊन मला 14 दिवस होम क्वारंटाइन व्हावे लागेल. पण, काहीही झाले तरी आपल्या देशात आलेले बरेच होईल. पण, सध्या मी लंडनमध्ये बिनधास्त आहे. मात्र, याठिकाणच्या लोकांना कोरोनाचे गांभीर्यच नसल्याचे मत पाकणी (ता. उत्तर सोलापूर) येथील वैष्णव गुंड याने व्हिडीओ कॉलींगवरुन व्यक्त केल्याची माहिती त्याचे वडील सुनील गुंड यांनी "सकाळ'ला दिली. 

पाकणीच्या सरपंच शोभा गुंड व हॉटेल व्यावसाईक सुनील गुंड यांचा वैष्णव हा मुलगा आहे. सिव्हील बी-टेक हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्याने लंडन येथील किंगस्टन विद्यापीठात प्रवेश घेतला आहे. सप्टेंबर 2019 ला तो भारतातून लंडनला गेला आहे. पण, आता संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे भारतातून परदेशात जाणारी व परदेशातून भारतात येणारी विमानसेवा पूर्णपणे बंद केली आहे. त्यामुळे वैष्णव लंडनमध्येच आहे. त्याच्या परीक्षा 15 एप्रिलला होणार होत्या. मात्र, कोरोनामुळे त्या पुढे ढकलल्या आहेत. कदाचीत परीक्षा ऑनलाइन घेण्याचा विचार विद्यापीठ करत आहे. सध्या त्याचे क्‍लास ऑनलाइन सुरु आहेत. परीक्षा संपवून तो मे महिन्यात भारतात येणार होता असे वैष्णवचे वडील गुंड यांनी "सांगितले. वैष्णव सोबत दिवसातून तीन-चार वेळा व्हीडीओ कॉलिंगद्वारे बोलणे होते. लंडन मध्ये त्याच्यासाठी किचन सेपरेट आहे. त्याठिकाणी तो जेवण तयार करुन खातो. त्याठिकाणी भारतासारखी बंधने नाहीत. दोन पेक्षा जास्त लोक एकत्र येणार नाहीत, याची काळजी घेतली जात आहे. तेथे आपल्या राज्यातील इतर जिल्ह्यातील काही मुले आहेत. आमदार रोहित पवार यांच्या संपर्कातील काही विद्यार्थी तेथे आहेत. त्यांचे खासदार शरद पवार यांच्यामार्फत भारतात येण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. खासदार पवार यांनी विदेशमंत्री एस. जयशंकर यांच्याशी याबाबत पत्रव्यवहारही केल्याचे गुंड यांनी सांगितले.