वाशी, आग्रा आणि हैद्राबाद बाजारपेठेत माल न गेल्याने काशीफळ भोपळा फेकला बांधावर

walvad.jpg
walvad.jpg

चारे(सोलापूर)ः वालवड (ता. बार्शी) येथील शेतकऱ्यांने काशीफळ भोपळा पिकवल्यानंतर बाजारपेठेत माल जात नसल्याने बांधावर फेकला आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे या पीकाच्या विक्रीसाठी लागणाऱ्या वाशी, आग्रा व हैद्राबाद बाजारपेठ वाहतूक बंद झाल्याने त्यांच्यावर ही वेळ आली आहे. 

या भोपळ्याला इतरत्र विशेष मागणी नाही व योग्य दर ही मिळत नसल्याने वालवड,चारे, पिंपळवाडी येथिल शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उत्पादन झालेला भोपळा बांधावर टाकून दिला आहे. 
वालवड (ता. बार्शी) येथील तरूण शेतकरी सुधीर जाधवर यांनी एप्रिल-मे महिन्यात सेंच्युरी जातीच्या काशीफळ भोपळा (डांगर) ची लागवड केली होती. यासाठी त्यांनी लागवड करावयाच्या क्षेत्राची मशागत करून शेणखत टाकले. सरी काढून त्यामध्ये सहा बाय तीन फूट अंतरावर ठिबक सिंचनाद्वारे लागवड केली. पासष्ट दिवसात येणाऱ्या या पिकास विविध सेंद्रिय खतांबरोबर रासायनिक खतांची मात्रा ही दिली. वेळोवेळी बुरशी व किटकनाशकांच्या फवारण्या केल्या. यामुळे पिक जोमदार आले. अंदाजे तेरा ते चौदा टन उत्पादन निघाले. 
पण सध्या अनेक बाजारपेठा बंद असल्याने शेतीमालाचे बाजारभाव कोसळले आहेत. परिणामी झालेला खर्च ही निघाला नाही. 
प्रत्येक वर्षी हिरवा काशीफळ भोपळा नवी मुंबई वाशी मार्केटला विकला जातो. त्याची मोठी मागणी असते. नंतर पिकलेला काशीफळ भोपळा सांबर बनविण्यासाठी दक्षिण भारतातील बाजारपेठेत नेला जातो. पेठा बर्फी बनविण्यासाठी आग्रा दिल्ली येथील व्यापारी देखील खरेदी करत असतात. पण कोरोना मूळे आंतरराज्य वाहतूक बंदच आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या या भोपळ्याला मागणी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी काशीफळ भोपळा बांधावर टाकून दिला आहे. 

पंचनामे करून मदत करावी 
कृषी विभागाच्या वतीने संबंधित काशीफळ भोपळा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी. 
- सुधीर जाधवर, काशीफळ भोपळा उत्पादक शेतकरी वालवड, ता. बार्शी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com