
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापूरे, उपाध्यक्ष प्रशांत धुम्मा, वधू-वर मेळाव्याचे कार्याध्यक्ष केदार बिराजदार, सल्लागार जगदीश पाटील, इरप्पा सालक्की, केदार उंबरजे, सुदीप चाकोते, संचालक विरेद्र हिंगमिरे, सहसिचव गुरूनाथ निंबाळे, सहखजिनदार सुनिल शरणार्थी उपस्थित होते.
द. सोलापूर(सोलापूर)ः वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्यावतीने लिंगशेट्टी मंगल कार्यालयात रविवारी (ता.23) सकाळी दहा वाजता सहावा राज्यस्तरीय वधू वर मेळावा होणार असून यावेळी "महाराष्ट्र वीरशैवरत्न' पुरस्काराचे वितरणही होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष विरभद्रेश बसवंती यांनी आज (ता.23) पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचाः दिलेले आश्वासन पाळून राज्य शासनाने वीज ग्राहकांना द्यावा दिलासाः चेंबर्स ऑफ कॉमर्स
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापूरे, उपाध्यक्ष प्रशांत धुम्मा, वधू-वर मेळाव्याचे कार्याध्यक्ष केदार बिराजदार, सल्लागार जगदीश पाटील, इरप्पा सालक्की, केदार उंबरजे, सुदीप चाकोते, संचालक विरेद्र हिंगमिरे, सहसिचव गुरूनाथ निंबाळे, सहखजिनदार सुनिल शरणार्थी उपस्थित होते.
हेही वाचाः वीजबिल सवलतीसाठी अक्कलकोट भाजपाचा एल्गार !
मेळाव्याचे उद्घाटन खासदार जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी, रेणुकशिवाचार्य हिरेमठ मंद्रूप, श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी प्रह्मलिंगश्वर बृहन्मठ नागणसूर, शिवपुत्र महास्वीम मठाधीश, वेदमूर्ती बसवराज शास्त्री महाराज यांच्या हस्ते होणार आहे. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उद्योजक सुधीर खरटमल आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.राजेंद्र हिरेमठ, माजी आमदार रविकांत पाटील, प्राचार्य गजानन धरणे, माजी महापौर शोभा बनशेट्टी, उद्योजक श्रीशैल काबणे, महादेव कोगनूरे, न्यायाधिश ऍड. प्रयंका लिगाडे, वाहन उपनिरिक्षक श्वेता नरखेडकर यांची प्रमुख उपस्थिती आहे. यंदा कोरोनामुळे हा वधू वर मेळावा मर्यादित असून शहरातील वधू वर व त्यांचे पालक यामद्ये सहभागी होऊन वधू वर व पालक ऑनलाईन सहभागी होणार असल्याचे जगदीश पाटील यांनी सांगितले. या मेळाव्याच्या कार्यक्रमातच महाराष्ट्र वीरशैवरत्न पुरस्काराचे वितरणही करण्यात येणार आहे. यंदाचा हा पुरस्कार कोरोना काळा मृत्यूमुखी पडलेल्या 1हजार 400 मृत व्याक्तीवर अंत्यसंस्कार केलेल्या पुणे येथील अरूण जंगम यांना देण्यात येणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. मेळाव्यात प्रतिष्ठान व अंबिका नवरात्र व्यापारी मंडळाच्या वतीने प्लाझ्मासह रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यानंतर 25 दिवसांनी मेळाव्यात सहभागी वधू वरांची माहीती पुस्तिकारूपाने छापण्यात येणार असल्याचे केदार बिराजदार यांनी सांगितले.