आसऱ्याची गर्दी ओसरेना : जड वाहतुकीत उसाच्या ट्रक्‍टरची भर, धुळीचे लोट कायम 

arsa  dugst problem
arsa dugst problem
Updated on

सोलापूर : विजयपूर महामार्गावरील धर्मवीर संभाजी तलावाशेजारील रेल्वे पूल जड वाहतुकीसाठी बंद असल्याने व दिवाळीच्या खरेदीसाठी डिमार्टला येणाऱ्या नागरिकांच्या वाहनामुळे या परिसरातील गर्दी कमी होताना दिसत नाही. यातच भर म्हणून उसाच्या ट्रक्‍टर व जड वाहतुकीमुळे या परिसरात अपघाताला निमत्रंण मिळत आहे. 

विजयपूर महामार्गावरील धर्मवीर संभाजी तलावाशेजारील रेल्वेपुलावरील जड वाहतूक 6 ऑक्‍टोबरपासून बंद आहे. ही सर्व जड वाहतूक महावीर चौक, आसरा चौक , डीमार्ट ते रोहिदास चौक अशी वळवण्यात आली आहे. यामुळे आसरा पुलावर व आसरा चौकात वाहनांच्या गर्दीचा महापूर आला आहे. त्यातच भरीतभर म्हणून मराठवाड्यातून कर्नाटक व पश्‍चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या उसाच्या ट्रक्‍टरमुळे आसरा परिसरात वाहतूक कोंडी, धुळ व डीमार्टला दिवाळीच्या खरेदीसाठी होणारी गर्दी यामुळे आसरा परिसर सतत वाहनांनी गजबजून राहत असून अपघाताच्या शक्‍यतेत वाढ झाली आहे. जड वाहतुकीसाठी ठराविक वेळ दिलेली असली तरी सहाचाकी वाहने, ट्रक्‍टर, एसटी बस यांची वाहतूक सुरूच असते, यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. 


पुलाच्या रुंदीकरणाची प्रतीक्षा 
14 ते 17 ऑक्‍टोबर या कालावधीत परतीच्या पावसाने शहर परिसराला झोडपून काढले. यामुळे मुळातच खड्डेमय असलेल्या आसरा पुलावर केलेली तात्पुर्ती मलमपट्टी पार उखडून गेली. पुलावर मोठमोठे खड्डे पडले. यामुळे परिसरातील नागरिकांचा संताप अनावर झाला, कल्याणनगर परिसरातील नागरिकांनी भर पावासात अचानक केलेल्या रास्ता रोकोमुळे वाहतूक पोलिसांना स्वत:च भर पावसात खड्डे बुजवावे लागले होते. मात्र ही मलपपट्टी अधिक काळ टिकली नाही. जाड खड्डीमुळे रस्ता अधिकच धोकादायक झाला. अनेक वेळा मातीमय मुरम टाकल्याने या पुलावरील खड्डे तर कायम राहिलेच शिवाय धुळीची समस्या ही कामय राहिली. अखेर खासदार डॉ. जयसिध्देश्‍वार महास्वामी, महापौर श्रीकाचंना यन्नम यांच्यासह अधिकाऱ्यांनी या पुलाचा पाहणी दौरा केला व दुसरा पुल उभारून ही समस्या सोडवण्याचे आश्‍वासन दिले आता या परिसरातील नागरिकांना दुसऱ्या पुलाची प्रतीक्षा लागली असून दुसरा पुल उभारल्यानंतरच या परिसरातील वाहतूक समस्या सुटणार आहे. 
 
ठळक बाबी 

  • अनेकदा मलमट्टी तरी ही खड्डे जीवघेणेच 
  • खड्डे बुजवण्यासाठी डांबरा ऐवजी मातीमिश्रीत मुरुमाचा वापर 
  • मातीमिश्रित मुरुमामुळे धुळीची समस्या कायम 
  • रहिवाशी व व्यावसायिक परिसर असल्याने जड वाहतूक धोकादायक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com