विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे 20 लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट ; रणजितसिंह शिंदे

संतोष पाटील
Sunday, 27 September 2020

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम 2020-21 चा 20 वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचे सभासद सौदागर तुकाराम पोळ व त्यांच्या सुविद्य पत्नी रूक्‍मिणीताई सौदागर पोळ (रा.रांझणी ता. माढा) यांच्या हस्ते व संचालक रणजितसिंह शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी संचालक रणजितसिंह शिंदे यांनी ही माहिती दिली. 

टेंभुर्णी (सोलापूर)ः विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने सन 2020 -21 या गळीत हंगामामध्ये 20 लाख मेट्रीक टन ऊसाचे गाळप करणेचे उद्दिष्ठ निश्‍चित केले आहे. या गाळप हंगामासाठी कारखान्याकडे 20 हजार 660 हेक्‍टर क्षेत्राची नोंद असून अंदाजे 22 लाख मेट्रीक टन ऊस गळीतास उपलब्ध होईल. साखर कारखान्याने प्रतिदिन गाळप क्षमतेएवढा उसाचा पुरवठा होण्यासाठी 1000 ट्रक, ट्रॅक्‍टर्स, 1300 बैलगाडी व 375 ट्रॅक्‍टर टायरगाडीचे करार करण्यात आलेले आहेत. ऑफ सिझन मधील सर्व कामे पूर्ण झालेली असून शासनाच्या धोरणानुसार गाळप हंगाम सुरू करून तो यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झालेली आहे अशी माहिती साखर कारखान्याचे संचालक तथा जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी दिली. 

हेही वाचाः धामणगावच्या ज्येष्ठ शेतकरी दाम्पत्याच्या कष्टाला सलाम करत खासदार निंबाळकरांनी केली अर्थिक मदत 

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम 2020-21 चा 20 वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचे सभासद सौदागर तुकाराम पोळ व त्यांच्या सुविद्य पत्नी रूक्‍मिणीताई सौदागर पोळ (रा.रांझणी ता. माढा) यांच्या हस्ते व संचालक रणजितसिंह शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी संचालक रणजितसिंह शिंदे यांनी ही माहिती दिली. 

हेही वाचाः कोविड रुग्णांनी घेतला ध्यान व सरावाचा आनंद 

प्रारंभी माजी आमदार कै.विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. बॉयलर प्रदीपन समारंभानिमित्त सत्यनारायण महापुजा साखर कारखान्याचे सभासद नागनाथ संदीपान नवले व त्यांच्या सुविद्य पत्नी संगीताताई नवले (रा.बारलोणी) यांच्या हस्ते झाली . 
रणजितसिंह शिंदे म्हणाले की, सध्या अतिरिक्त साखर उत्पादन, साखरेचे दर व कोव्हीड-19 यासह अनेक अडचणींना तोंड देत साखर कारखानदारी मार्गक्रमण करीत आहे. केंद्रशासनाने इथेनॉल उत्पादनास दिलेल्या प्रोत्साहनातंर्गत कारखान्याने सध्याचे डिस्टीलरी प्रकल्पाची क्षमता 60 केएलपीडीवरून 150 केएलपीडी पर्यंत विस्तारवाढ केलेली आहे. या प्रकल्पातून उत्पादीत होणारे इथेनॉल ऑईल कंपन्यांना विक्री करण्यात येणार असून त्याचा आर्थिक लाभ संस्थेस होणार आहे. 
साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची यशस्वी घौडदौड चालू असून कारखान्याने अल्पवधीत गाळपक्षमता 11000 मेट्रीक टन, 38 मेगावॅट सहविजनिर्मिती प्रकल्प, डिस्टीलरी प्रकल्प 150 केएलपीडी पर्यंत विस्तारवाढ, 250 मेट्रीक टन रिफाईन शुगर प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वीत केले आहेत अशी माहीती संचालक रणजितसिंह शिंदे यांनी दिली. 
यावेळी साखर कारखान्याचे संचालक बबनराव पाटील, पोपट चव्हाण, दिपक पाटील, कार्यकारी संचालक आर.एस. रणवरे, जनरल मॅनेजर एस.आर. यादव, वर्क्‍स मॅनेजर सी.एस.भोगाडे, चिफ केमिस्ट पी.एस. येलपले, डिस्टीलरी मॅनेजर पी.व्ही.बागल, शेतकी अधिकारी एस.एस.बंडगर, परचेस ऑफिसर जे.डी. देवडकर, सिव्हील इंजिनिअर एस.आर. शिंदे ,सुरक्षा अधिकारी एफ.एम.दुंगे, कामगार प्रतिनिधी अनिल वीर आदी उपस्थित होते.  
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vitthalrao Shinde Sugar Factory aims to crush 20 lakh MT of sugarcane; Ranjit Singh Shinde