को-मॉर्बिड रुग्णांवर ठेवला वॉच ! सर्वात कमी रुग्णांमध्ये प्रभाग दुसऱ्या क्रमांकावर; प्रभागात आता उरले पाच रुग्ण

तात्या लांडगे
Friday, 6 November 2020

प्रभागाविषयक ठळक बाबी...

  • आतापर्यंत 166 जण झाले बाधित
  • एकूण रुग्णांपैकी 149 रुग्णांनी केली मात
  • आता उरले प्रभागात पाच रुग्ण
  • आतापर्यंत 11 रुग्णांचा झाला मृत्यू

सोलापूर : हातावरील पोट असलेल्या आणि विड्या वळून पोटाची खळगी भागविणारा प्रभाग 11 आता कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर आहे. या प्रभागात आता पाच रुग्ण उरले असून सर्वात कमी कोरोना बाधितांमध्ये हा प्रभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. नगरसेवकांनी प्रत्येक नगरात मोफत आरोग्य शिबिरे घेतली. त्यानंतर नगरसेवकांनी आपापल्या भागातील 60 वर्षांवरील संशयितांवर वॉच ठेवला. त्यांची माहिती घेऊन त्या लोकांवर वॉच ठेवल्याने या प्रभागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला नाही.

 

कामगारांची मोठी संख्या असल्याने त्यांना कामावर गेल्यावरच उदरनिर्वाह होतो. 12 आरोग्य शिबीरे घेतली, गरजूंना धान्य वाटप केले. त्यामुळे ते लोक घराबाहेर पडले नाहीत. अक्‍कलकोट रोड, सूत मिल, मल्लिकार्जून नगर, किसान नगर, राजीव नगर, समाधान नगर, गणेश नगर, भिम नगर, अंबिका नगर, विष्णूपंत नगर, गंगाधर नगर आणि साई नगर या भागातील कोरोनाचा थांबल्याचा दावा नगरसेवकांनी केला आहे. मधूमेह आणि उच्च रक्‍तदाब असलेल्यांची स्वतंत्र यादी तयार करुन आशासेविकांच्या माध्यमातून त्यांची टेस्ट केली. व्हिटॅमीन गोळ्या वाटप करताना त्यांच्या मनातील भिती घालविली. शासकीय योजनांचा लाभ अधिकाऱ्यांच्या माध्यातून त्यांच्यापर्यंत पोहचविला. त्यासाठी नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते महेश कोठे, नगरसेविका कुमूद अंकराम, अनिता मगर, नगरसेवक राजकुमार हंचाटे यांनी परिश्रम घेतले.

नगरानगरांमध्ये घेतली आरोग्य शिबिरे
नगरानगरांमध्ये आरोग्य शिबिरे घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर भर दिला. व्हिटॅमिन गोळ्या, मास्क वाटप, सॅनिटायझर वाटप केले. धान्य वाटप करुन लोक घराबाहेर पडणार नाहीत, याची दक्षता घेतली. त्यामुळे कामगार वस्तीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची विविध तरुण, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जनजागृतीवर भर दिला. 
- राजकुमार हंचाटे, नगरसेवक

 

लोक घराबाहेर पडणार नाहीत, याची घेतली खबरदारी
भारत नगर, पवन नगर, जवाहर नगर, पीठा नगर, शेरालिंग नगर, राघवेंद्र नगर, विडी घरकूल यासह 72 नगरांमध्ये आरोग्य शिबिरे आयोजित केली. संशयितांची माहिती घेऊन त्यांची रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट केली. वेळेत उपचार करुन त्यांचा जीव वाचविण्यात यश मिळविता आले. लोक घराबाहेर पडणार नाहीत, याची खबरदारी घेतली. 
- कुमूद अंकाराम, नगरसेविका

प्रभागाविषयक ठळक बाबी...

  • आतापर्यंत 166 जण झाले बाधित
  • एकूण रुग्णांपैकी 149 रुग्णांनी केली मात
  • आता उरले प्रभागात पाच रुग्ण
  • आतापर्यंत 11 रुग्णांचा झाला मृत्यू

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ward 11 ranks second among least patients; There are now five patients left in the ward