डेंजर झोनमधील प्रभाग 24 आता सावरतोय : प्रभागात 77 ऍक्‍टिव्ह रुग्ण; नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे नगरसेवकांचे आवाहन 

तात्या लांडगे 
Sunday, 22 November 2020

उपमहापौर राजेश काळे यांनी सांगितले की, सोशल मिडियाच्या माध्यमातून मोबाईलमधील 126 ग्रूपमधील नागरिकांना जनजागृतीचे मेसेज टाकले. संशयितांवर तत्काळ उपचार व्हावेत म्हणून रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट, आरोग्य शिबिरे घेतली. अजूनही घेतली जाणार आहेत. जुळे सोलापुरातील ज्येष्ठ नागरिकांचा सर्व्हे करुन त्यांच्या सुरक्षिततेचे उपाय केले जात आहेत. कामगार, गरजूंना धान्य वाटप करुन त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या सहकार्यामुळे आता प्रभागातील कोरोना आटोक्‍यात येत आहे

सोलापूर : शहरातील 26 प्रभागांच्या तुलनेत सर्वाधिक 996 रुग्ण 24 नंबर प्रभागात आढळले आहेत. प्रभागातील एकूण रुग्णांपैकी 885 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जुळे सोलापूरसह त्या परिसरात सवाधिक रुग्ण आढळले असून सुरवातीपासूनच हा प्रभाग डेंजर झोनमध्ये होता. नगरसेवकांनी जनजागृतीसह अन्य उपाययोजनांवर भर दिल्याने आता हा प्रभाग सावरु लागला आहे. 

जुळे सोलापूरचा विस्तार आता वाढू लागला आहे. प्रभाग 24 मधील मंत्री चंडक पार्क, जय जलाराम नगर, विरशैव नगर, श्रीकांत नगर, शिवरत्न नगर, सिंधू विहार व जानकी नगरात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. सोलापूर शहरातील जुळे सोलापुरात सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक आहेत. सुरवातीला मुलांशिवाय राहणाऱ्या को- मॉर्बिड रुग्ण कोरोनाचे बळी ठरले. प्रभागातील 34 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे शहरातील अन्य प्रभागांच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण सापडत असल्याने उपमहापौर राजेश काळे, नगरसेविका संगिता जाधव, राजश्री पाटील- बिराजदार, अश्‍विनी चव्हाण यांनी जनजागृती भर दिला. रुग्णसंख्या आटोक्‍यात यावी, मृत्यू थांबावेत म्हणून त्यांनी ठोस उपाययोजना केल्याने आता प्रादुर्भाव कमी झाला असून मृत्यूची संख्याही घटल्याचे चित्र आहे. मात्र, नागरिकांनी नियमांचे तंतोतंत पालन केल्यास निश्‍चितपणे हा प्रभाग कोरोनामुक्‍त होईल, असा विश्‍वासही नगरसेवकांनी "सकाळ'च्या माध्यमातून व्यक्‍त केला आहे. 
उपमहापौर राजेश काळे यांनी सांगितले की, सोशल मिडियाच्या माध्यमातून मोबाईलमधील 126 ग्रूपमधील नागरिकांना जनजागृतीचे मेसेज टाकले. संशयितांवर तत्काळ उपचार व्हावेत म्हणून रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट, आरोग्य शिबिरे घेतली. अजूनही घेतली जाणार आहेत. जुळे सोलापुरातील ज्येष्ठ नागरिकांचा सर्व्हे करुन त्यांच्या सुरक्षिततेचे उपाय केले जात आहेत. कामगार, गरजूंना धान्य वाटप करुन त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न केला. नागरिकांच्या सहकार्यामुळे आता प्रभागातील कोरोना आटोक्‍यात येत आहे. 

नगरसेविका संगिता जाधव यांनी सांगितले की, प्रभागातील संतोष नगर, शांती अपार्टमेंट, विशाल नगर, कोणार्क नगरातील नागरिकांसाठी रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट मोहीम राबविली. आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून जनजागृतीवर भर दिला. लॉकडाउन काळात गोरगरिब नागरिक घराबाहेर पडू नयेत म्हणून धान्य वाटपही केले. संशयित रुग्णांवर वॉच ठेवून त्यांना वेळेत उपचार व्हावेत, म्हणूनही प्रयत्न केले. प्रभागातील नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. 

प्रभागाविषयक ठळक बाबी... 

  • - आतापर्यंत 996 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह 
  • - एकूण रुग्णांपैकी 885 जणांची कोरोनावर मात 
  • - प्रभागातील 34 रुग्ण ठरले कोरोनाचे बळी 
  • - सद्यस्थितीत 77 रुग्णांवर सुरु आहेत उपचार 

संपादन : अरविंद मोटे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ward 24 in Danger Zone is now recovering: 77 active patients in the ward; Appeal of corporators to strictly follow the rules