esakal | वॉटर प्युरिफायर व्यावसायिकाची हेराफेरी ! मीटरमध्ये फेरफार करून वैराग येथे तीन लाखांची वीजचोरी

बोलून बातमी शोधा

Power Theft.}

बार्शी तालुक्‍यातील वैराग येथे महावितरणच्या भरारी पथकाने वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय करणाऱ्या उद्योजकाची वीज चोरी पकडली आहे. शारदा ऍक्वा नावाच्या थंड पाणी विकणाऱ्या उद्योगातील वीज जोडणीची तपासणी केल्यानंतर सुमारे 3 लाख 12 हजार 91 रुपयांची वीज चोरी येथे उघड झाली आहे. 

solapur
वॉटर प्युरिफायर व्यावसायिकाची हेराफेरी ! मीटरमध्ये फेरफार करून वैराग येथे तीन लाखांची वीजचोरी
sakal_logo
By
कुलभूषण विभूते

वैराग (सोलापूर) : बार्शी तालुक्‍यातील वैराग येथे महावितरणच्या भरारी पथकाने वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय करणाऱ्या उद्योजकाची वीज चोरी पकडली आहे. शारदा ऍक्वा नावाच्या थंड पाणी विकणाऱ्या उद्योगातील वीज जोडणीची तपासणी केल्यानंतर सुमारे 3 लाख 12 हजार 91 रुपयांची वीज चोरी येथे उघड झाली आहे. याबाबत महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुरेश चनबसप्पा जोगी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, शहर पोलिस ठाण्यात वीज ग्राहक सुरतिसेन अण्णासाहेब चव्हाण व वीज वापरदार सूरज अण्णासाहेब चव्हाण या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत भरारी पथकाने दिलेली माहिती अशी, की सुरेश जोगी यांनी सहाय्यक अभियंता राजेश पिलाजी घोडे, सहाय्यक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी सागर शिवाजी जोडवे, वरिष्ठ तंत्रज्ञ नितीन मारुती विभूते, गणेश बबन पसफुले हे अधिकाऱ्यांचे पथक विजेची तपासणी करत होते. वैराग येथील संतनाथ नगरात वीज ग्राहक सुरतिसेन अण्णासाहेब चव्हाण व वीज वापरदार सूरज अण्णा चव्हाण यांना शारदा ऍक्वा यासाठी दिलेल्या कमर्शिअल जोडणीच्या मीटरची तपासणी केली. त्यामध्ये दोन फेजचा करंट शून्य दर्शविला गेला. त्यामुळे मीटर अक्‍युचेकने तपासून पाहिले असता ते -68.90 टक्के मंदगतीने सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ते वीज मीटर जप्त करून सोलापूर येथे पाठवून टेस्टिंग बेंचवर उघडून पाहिले असता मीटरच्या मागील बाजूस छिद्र पाडून फेजच्या वायरी कट केल्याचे दिसून आले. 

अशा प्रकारे मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी करत असल्याचे स्पष्ट झाले. तपासणीत अशा प्रकारे त्यांनी 24 महिन्यांच्या कालावधीत 15 हजार 439 युनिटची वीज चोरी करून महावितरणचे 2 लाख 87 हजार 91 रुपयांचे नुकसान केल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यांना तडजोड मूल्यासह 3 लाख 12 हजार 91 रुपयांचे बिल देण्यात आले. ते न भरल्याने त्यांच्या विरोधात विद्युत चोरी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल