कुरनूर धरणाचा पाणीसाठा पोहोचला पन्नास टक्क्यांवर  

राजशेखर चौधरी
Tuesday, 22 September 2020

मागील वर्षी कुरनूर धरण साधारणतः 25 सप्टेंबरला 35 टक्के, नऊ ऑक्‍टोबरला 61 टक्के भरले होते. त्यानंतर कुरनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने अखेर ता.21 ऑक्‍टोबर रोजी शंभर टक्के भरले होते. यामुळे या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या अक्कलकोट शहर, दुधनी, मैंदर्गी या शहराच्या पाणीपुरवठा सह शेतकरी व बोरी नदीकाठच्या गावाना मोठा दिलासा मिळाला होता. 

अक्कलकोट(सोलापूर) : अक्कलकोट शहरासह मैंदर्गी व दुधनी नगरपरिषद याचप्रमाणे या खाली असणाऱ्या सात बंधाऱ्यांच्या परिसरात असणाऱ्या नागरिकांना व शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या कुरनूर धरणाने आज अर्धशतकी मजल मारली आहे. यामुळे पावसाळ्याच्या शेवटी का होईना आणखी एक दोन मोठे पाऊस झाल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची आशा निर्माण झाली आहे. 

हेही वाचाः स्मार्ट सिईओचा महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिला राजीनामा 

मागील वर्षी कुरनूर धरण साधारणतः 25 सप्टेंबरला 35 टक्के, नऊ ऑक्‍टोबरला 61 टक्के भरले होते. त्यानंतर कुरनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने अखेर ता.21 ऑक्‍टोबर रोजी शंभर टक्के भरले होते. यामुळे या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या अक्कलकोट शहर, दुधनी, मैंदर्गी या शहराच्या पाणीपुरवठा सह शेतकरी व बोरी नदीकाठच्या गावाना मोठा दिलासा मिळाला होता. 

हेही वाचाः माझे कुटुंब माझी जबाबदारी कागदावरच ! शहरात आज येथे सापडले 53 पॉझिटिव्ह अन तिघांचा मृत्यू 

आज मंगळवारी सकाळी कुरनूर धरण एकूण क्षमता असलेले 822 दशलक्ष घनफुट पाण्यापैकी 404 दशलक्ष घनफुट इतके म्हणजेच 49 टक्के पाणी साठले आहे.अक्कलकोट तालुक्‍यातील कुरनूर धरण परिसर गावे आणि त्याखील पूर्व भागातील बोरी नदीकाठची गावे यांची तहान भागण्यासाठी ते भरणे महत्वाचे आहे. तुळजापूर तालुक्‍यातील बोरी धरण अद्याप न भरल्याने त्यातून खाली पाणी सोडले गेले नाही. त्यातच कुरनूर धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाने धरण पन्नास टक्केपर्यंत पोचले आहे. सध्या उत्तरा नक्षत्राची दोन दिवस तसेच हस्ता, चित्रा आणि स्वाती ही तीन नक्षत्रे शिल्लक आहेत. या काळात आणखी एक दोन पाऊस मोठी झाले तर कुरनूरसह तालुक्‍यातील इतर छोट्या मोठया तलावातील पाणी साठा आणखी वाढणार आहे. दरवर्षी प्रमाणे जेऊर,करजगी व तडवळ भागात पुन्हा पाऊस हा कमीच झाला असून इतर भागात त्यामानाने थोडा बरा झालेला दिसून येत आहे. सध्या कुरनूर धरणाला मिळणाऱ्या हरणा नदीचा प्रवाह हा बोरी नदीपेक्षा जास्त आहे. 

आतापर्यंतच झालेला पाऊस 

अक्कलकोटला तालुका ता.22 सप्टेंबर 2020 पर्यंत नोंदलेली पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये खालीलप्रमाणे आहे. अक्कलकोट (296),चपळगाव (365) वागदरी (338),किणी (415),मैंदर्गी (320), दुधनी (461),जेऊर (232),करजगी (221),तडवळ (225) 

संपादन ः प्रकाश सनपूरकर  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The water storage of Kurnoor dam has reached fifty percent