आठवडी बाजाराअभावी कारागिरांवर उपासमारीची वेळ 

athwadi bajar.jpg
athwadi bajar.jpg
Updated on

चिखलठाण(सोलापूर)ः ग्रामीण भागात भरणारे आठवडी बाजार बंद झाल्यामुळे खेडेगावातील शेतीकामाच्या वस्तू तयार करणारे कारागीर व बलुतेदारांवर गावोगावी भटकंती करण्याची वेळ आली आहे. बाजाराअभावी अपेक्षीत विक्री होत नसल्याने त्यांची उपासमार होऊ लागली आहे. 

आजही ग्रामीण भागातील गावागावात अनेक कारागीर व बलुतेदार शेतीसाठी व शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी लागणाऱ्या वस्तू घरी बनवतात. नंतर या वस्तू आठवडी बाजारात विकून त्यांची उपजीविका करत असतात. त्यांचे सर्व कुटूंबच या साठी कष्ट घेत असते. यापैकी बहूतांश कारागिरांना शेती किंवा जगण्यासाठी इतर उदरनिर्वाहाचे साधन नाही. संपूर्ण कुटुंबाची उपजिवीका याच व्यवसायावर अवलंबून असते. 

त्यांच्या स्वतःच्या गावात त्यांनी तयार केलेल्या सर्व वस्तू विकू शकत नाहीत. त्यामूळे कुटूंबप्रमुख आसपासच्या दोन तीन मोठ्या गावातील आठवडा बाजारामध्ये दिवसभर बसून या वस्तू विकण्याचे काम करतात. सध्या लॉकडाउनमुळे आठवडे बाजार बंद आहेत. त्यामुळे कारागीर व बलुतेदार कुटुंबानी तयार केलेल्या वस्तू विकण्यासाठी दररोज नवीन गावाला फिरावे लागत आहे. सध्या एस.टी. किंवा खाजगी वहातुकीची साधने वेळेवर उपलब्ध होत नाहीत. एका गावावरून दुसऱ्या गावाला हे सामान डोक्‍यावर घेऊन चालतच भटकंती करण्याची वेळ या लोकांवर येत आहे. कोरोना फैलावाच्या कारणामुळे काही गावात कारागिरांना लोकांना एका ठिकाणी बसुन किंवा फिरूनही विक्री करू देत नाहीत. त्यामुळे अशा छोट्या कारागीर व बलुतेदारांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. 

तीन गावात फिरूनही विक्री नाही
शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी लागणारी दोर, कासरे, कान्या, मोहरकी, वेसन आम्ही घरी तयार करून आठवडा बाजारात विकण्याचे काम अनेक वर्षांपासून करतो. सध्या आठवडी बाजारच बंद झाल्याने गावोगावी फिरून विकण्याची वेळ आली आहे. आठवडी बाजारात एका ठिकाणी दहा ते बारा गावातील शेतकरी येत असल्याने आमची विक्री चांगली होते. परंतु आता तीन गावात फिरूनही अपेक्षीत विक्री होत नाही. त्यामुळे आमच्या सारख्या कारागीरांवर व बलुतेदारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

. - ज्ञानेश्वर मोहीते बिटरगाव ता करमाळा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com