स्मार्ट सिटी कामाच्या दर्जाबाबत नागरिकांना काय वाटते? ते वाचा

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 1 जुलै 2020

सिद्धेश्‍वर मंदिराच्या तीनही बाजूंनी पदपथाचे काम करण्यात येत आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, या कामाच्या बाबतीत येथील विकासप्रेमी नागरिक उमेश पाटील यांनी टीका केली आहे.

सोलापूर: शहरातील सिद्धेश्‍वर मंदिराच्या सर्व बाजूंनी होणाऱ्या स्मार्ट सिटी योजनेच्या पदपथाच्या कामाबाबत हे काम योग्य दर्जा राखण्याबाबत नागरिकांना मधून टिका केली जात आहे. 

हेही वाचाः सरकारने परवानगी दिल्यास महाविद्यालये सुरू करणारः शिवशरण खेडगी 

सिद्धेश्‍वर मंदिराच्या तीनही बाजूंनी पदपथाचे काम करण्यात येत आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, या कामाच्या बाबतीत येथील विकासप्रेमी नागरिक उमेश पाटील यांनी टीका केली आहे. त्यानुसार अगदी सुरवातीला कामाचा दर्जा राखला गेला. हे काम पुढे गणपती मंदिर परिसरापर्यंत पोचल्यानंतर कामाच्या दर्जाबाबत नागरिकांना शंका येऊ लागली आहे. एक तर कोणत्याच कामात वाळूचा उपयोग केलेला नाही. ज्या भागात काम झाले तेथील गिट्टी किंवा दगड उघडे पडू लागले आहेत. सिमेंट कामाचा थर देखील फारसा चांगला झाला नाही. रस्त्याच्या कामावर सिमेंटचे काम असल्याने भरपूर पाणी द्यावे लागते. सुरवातीच्या कामावर रिकामी पोती टाकून वॉटरिंगचे काम झाले. मात्र आता पावसाच्या भरवशावर काम केले जात आहे. भरपूर पाणी देता केवळ हंड्याने पाणी दिले जात आहे. या सर्व कामाच्या संदर्भात श्री. पाटील यांनी अशा पद्धतीने विकासकामाचा दर्जा ठेवणे योग्य नाही. सिद्धेश्‍वर तलावात भरपूर पाणी असून देखील हंड्याने पाणी देणे चुकीचे आहे. 

हेही वाचाः तपमानाच्या अचूक निदानासाठी हेडबॅंड 

स्मार्ट सिटी कामामध्ये कामाची गुणवत्ता महत्त्वाची आहे. पण, त्यासोबत सिद्धेश्‍वर मंदिराच्या परिसरातील हे काम असल्याने राज्यभरातून दर्शनासाठी येणाऱ्या लोकांना अशा कामाचा पुरेसा लाभ मिळणार नाही, असेही श्री. पाटील यांचे म्हणणे आहे. दरम्यान, याबाबत काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की कामाच्या ठिकाणी पाणी देण्यासाठी मोटार लावण्यात आली आहे. तसेच कामाच्या गुणवत्तेबाबत मनपा व गुणवत्ता नियंत्रण अधिकारी कामाची तपासणी करत असतात. तपासणी अधिकारी या कामासाठी उपलब्ध आहे असे त्यांनी नमूद केले. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What do citizens think about the quality of smart city work? Read it