सोलापूर मर्चंट बॅंकेचे पतसंस्थेत रुपांतर करण्याचा ठराव अंमलात कधी येणार ? 

sahkar.jpg
sahkar.jpg
Updated on

सोलापूरः शहरातील काही वर्षांपूर्वी बंद पडलेली सोलापूर मर्चंट बॅंकेचे पुर्नजीवन करून त्याचे पतसंस्थेत रूपांतर व्हावे असा ठराव बॅंकेच्या शेवटच्या सभेत झाला होता. मात्र अद्याप या ठरावाची अंमलबजावणी कधी होणार असा प्रश्‍न सभासदांकडून विचारला जात आहे. 

काही वर्षापूर्वी सोलापूर मर्चंट को-ऑप बॅंक अवसायनात निघाली होती. बॅंकेची आर्थिक स्थिती भक्कम असताना देखील त्यावेळेस नियमांच्या काही तांत्रिक अडचणीमुळे ही बॅंक अवसायनात निघाली होती. प्रत्यक्षात बॅंकांवरील ग्राहकांचा विश्वास चांगला असल्यामुळे पुढील काळात देखील आर्थिक व्यवहारही चांगल्या पद्धतीने होत राहीले. तसेच बॅंकेवर देणी फार मोठ्या प्रमाणात नव्हती. 
बॅंकेची इमारत व चांगले आर्थिक व्यवहार या दोन्ही गोष्टी बॅंकेच्या दृष्टीने सकारात्मक होत्या. बॅंक अवसायनात निघाल्यानंतर देखील बॅंकेचे आर्थिक व्यवहार चांगल्या पद्धतीने सुरू राहिली. संचित तोट्याच्या तुलनेमध्ये बॅंकेचे उत्पन्न हे सरप्लस असल्याचे दिसून आले. केवळ काही तांत्रिक अडचणीमुळे बॅंकेवर अवसायनाची वेळ आली. प्रत्यक्षात सोलापूर शहरासाठी सोलापूर मर्चट बॅंक प्रतिष्ठेची संस्था मानली जाते. 
बॅंकेच्या शेवटच्या सभेत सभासदांनी बॅंकेचे रुपांतर पतसंस्थेत करावे असा ठराव मांडला होता. हाच ठराव बॅंकेचे पतसंस्थेत रुपांतर करण्यासाठी महत्वाचा दुवा मानला जात आहे. 
बॅंकेची आर्थिक क्षमता लक्षात घेऊन या बॅंकेचे पतसंस्थे मध्ये रूपांतर करणे शक्‍य आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक व्यवहाराची घडी सुरळीतपणे बसवली जावी अशी भूमिका सभासदांकडून मांडली जात होती. पतसंस्थेमध्ये रुपांतर करणे सहकार खात्याकडे होणारी संस्था नोंदणी व नियंत्रण ही राज्याच्या अखत्यारीतील बाब आहे. तसेच सहकाराच्या तत्वाला अनुसरूनच ही प्रक्रिया योग्य आहे असे मानले जाते. 
त्यादृष्टीने काही सभासदांनी जिल्हा पतसंस्था फेडरेशनकडे पूनर्जीवनाची भूमिका मांडल्याचे समजते. रिझर्व्ह बॅंकेने बॅंकिग लायसन्स संपल्यानंतर पुढील रुपांतराबाबत परवानगीची गरज लागत नाही असे स्पष्टीकरण केले. अवसायनाची मुदतवाढ हा बॅंकेच्या सक्षम आर्थिक स्थितीचा पुरावाच असल्याचे मानले जाते. याबाबत सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन कोणती भूमिका घेणार हे महत्वाचे ठरणार आहे. अद्याप तरी फेडरेशनने याकडे लक्ष दिलेले नाही. 

आर्थिक संस्था पुन्हा सक्षमपणे उभ्या राहाव्यात
शहरातील आर्थिक संस्था पुन्हा सक्षमपणे उभ्या राहाव्यात ही सकारात्मक भावना महत्वाची आहे. चांगली आर्थिक स्थिती असणाऱ्या संस्थाचे पूनर्जीवन व्हावे ही अपेक्षा आहे. 
- राजू राठी, अध्यक्ष, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स सोलापूर 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sina Madha Water Scheme Demand Grows as Tulshi Villagers Begin Hunger Strike for Inclusion and Irrigation Water
Pandharpur Gets 493 Crore Road Development Package Ring Road and 9 Roads Approved With Two New Bridges
Laxman Hake Y Plus Security Under Fire as Mahesh Dongre Patil Gives Government 15 Days Before High Court Action
Young Woman Taken to Lodge and Allegedly Assaulted Man Booked After Blackmailing Her for Gold Chain and Money
Marathi News Esakal
www.esakal.com